वृद्धाची गळा चिरून हत्या!किनगाव हादरले
वृद्धाची गळा चिरून हत्या!किनगाव हादरले
प्रतिनिधी यावल -तालुक्यातील किनगाव येथिल वयोवृद्धाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.यावल तालुक्यातील किनगाव येथिल इंदिरानगर भागातील रहिवाशी असलेल्या साठ वर्षीय वृद्धाची गळा चिरून व दगडाने ठेचुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती आज दिनांक २४/०३/२०२३ शुक्रवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे. भीमराव सोनवणे वय अंदाजित साठ वर्षे या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे .घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून भीमराव सोनवणे वय अंदाजित साठ वर्षे हे किनगाव बुद्रुक येथे मुलासोबत वास्तव्यास होते ते खाजगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी सकाळी इंदिरानगर जवळील चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाखाली त्यांचा गळा चिरून व दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह शेत मजुरांना दिसला असता त्यांनी किनगाव बुद्रुक येथिल घटनेची माहिती यावल पोलिसांना देण्यात आली,घटनेची माहिती मिळताच फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरुडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून आरोपीच्या शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे या घटनेबाबत मयत भीमराव सोनवणे यांचा मुलगा विनोद भीमराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .भीमराव सोनवणे यांचा खून कश्यासाठी करण्यात आला व कोणी केला याची माहिती अद्यापही मिळालेली नाही.पुढील तपास फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे व यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत