सायाळ प्राण्याची शिकार करून खाणे भोवले चार जणांना, सायाळ प्राण्याचे घटनास्थळी अवशेष मिळाल्यामुळे ४ संशयित वन विभागाच्या ताब्यात.
सायाळ प्राण्याची शिकार करून खाणे भोवले चार जणांना,
सायाळ प्राण्याचे घटनास्थळी अवशेष मिळाल्यामुळे ४ संशयित वन विभागाच्या ताब्यात.
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर -वडोदा वनक्षेत्र लगत असलेल्या चिंचखेडा खुर्द शेत शिवारात साळींदर जातीच्या प्राण्याची शिकार करून भाजी तयार करून खात असल्याची गुप्त माहिती कुऱ्हा येथील वन विभागाच्या कार्यालयात मिळतात वडोदा वन विभागाची वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे, वनपाल बी. आर. मराठे वनरक्षक ज्ञानोबा धुळगुंडे, राम असुरे, बी बी थोरात ,गोकुळ गोसावी, वनमजूर अशोक तायडे, अशोक पाटील, शुभम पाटील यांचे पथक चिंचखेडा खुर्द शेत शिवारातील सुपडा रामचंद्र मेनकर यांच्या शेतात गेले असता त्या ठिकाणी जमिनीवर पडलेले रक्त, रक्त लागलेली काठी साळींधरांचे चार पंजे आणि अर्धवट जळालेले काटे दिसून आले सदर सुपडा मेनकर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चिंचखेडा येथील ऋषिकेश अहिरकर यांच्या शेतातील शेडमध्ये साळींदरांचे मास शिजवत असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकाणी साळींदराचे कच्चे मास शिजत असल्याचे दिसून आले याप्रकरणी संशयित आरोपी निवृत्ती उर्फ बाबुराव रामचंद्र मेनकर ,ऋषिकेश सुरेश अहिरकर सुपडा रामचंद्र मेनकर, रा. चिंचखेडा खुर्द तर शंकर साहेबराव सपकाळ रा. बुलढाणा या चौघांना वन विभागाने ताब्यात घेतले असून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत