सावदा रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेतून कायापालट होणार
लेवाजगत न्यूज सावदा -अमृत भारत योजनेंतर्गत विभागातील ३५ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. त्यात रावेर, सावद्याचा समावेश असल्याची माहिती डीआरएम एस.एस.केडिया, गती शक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक नवीन पाटील यांनी दिली. या योजनेत निवड झालेल्या स्थानकांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, मार्ग, स्थानकावरील शेड, प्रतीक्षालय, आरामकक्ष, पादचारी पूल, लिफ्ट, गार्डनची निर्मिती होणार आहे.
ही कामे कुठे व कशा प्रकारे होतील याचे नियोजन करण्यात आले. निरीक्षणावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज मानसपुरे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता पालटासिंग, वरिष्ठ विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता विजय कांची, वरिष्ठ मंडळ अभियंता (दक्षिण) निशांत कुमार व मंडळ अभियंता शुक्ला उपस्थित होते. इतरही स्थानकांवर नियोजन सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत