तीस वर्षाच्या प्रतिक्षे नंतर झालेल्या भेटी नंतर शाळेतील आठवणींना आला उजाळा महात्मा गांधी विद्यालय दिघोडे 1990 च्या एस एस्सी बच चा स्नेह भोजन आनंदात संपन्न
तीस वर्षाच्या प्रतिक्षे नंतर झालेल्या भेटी नंतर शाळेतील आठवणींना आला उजाळा
महात्मा गांधी विद्यालय दिघोडे 1990 च्या एस एस्सी बच चा स्नेह भोजन आनंदात संपन्न
उरण (सुनील ठाकूर )उरण तालुक्यातील दिघोडे येथील महात्मा गांधी विद्यालय दिघोडे शाळेतील SSC 1990 बॅच दहावीच्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचा पहिला वहिला स्नेह मिलन कार्यक्रम नुकताच कंठवली येथील M.J .फॉर्म् येथे भरघोस उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवन म्हणजे जीवनातील एक कधीही न विसरता येणारा अविस्मरणिय आठवणींचा अध्याय. मात्र दहावीच्या परीक्षेनंतर मित्र-मैत्रिणींच्या पुढील जीवन-प्रवासात वेगवेगळ्या वाटांनी गेल्याने ताटातुट झाली. मात्र आता सुमारे 33 वर्षानंतर सोशल मिडियाच्या व्हाट्सअप माध्यमातून एक ग्रुप तयार झाला आणि एकमेकांपासुन इतकी वर्षे दुरावलेली दहावीतील बालसुलभ चिमणपाखरे वयाच्या पन्नाशीकडे पोहोचत असताना दुर अंतरावरुन एकत्र आली. एक छोटेखानी गेट-टुगेदर करण्याचा बेत आकाराला आला. श्री. कीर्तिनिधी ठाकूर यांच्या हस्ते श्रीगणेश वंदना व पूजन झाले. नंतर राष्ट्रगीत, प्रार्थना व महाराष्ट्र गीत याने कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली. उपस्थित सर्वांचे स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. प्रत्येकाने आपले मनोगत थोडक्यात प्रकट केले. आपल्या जुन्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सध्या कोण कुठे काय करत आहे याचा मागोवा घेतला गेला. कार्यक्रमात सुरेल संगीत मेजवानी म्हणून प्रोफेशनल गायक मनोहर फुंडेकर यांनी म्युझिक सिस्टीमसह गायन केले. सुत्रसंचालन व निवेदन बळीराम पाटील यांनी केले. मित्र-मैत्रिणींनी आनंदाला उधाण असा ग्रुप डान्स केला. आपल्या आतील गायक गायिकेला ही गायनाची संधी दिली. हास्यविनोद, फनी गेम झाले. आठवणींच्या अल्बमसाठी फोटो व व्हिडियो काढले गेले, शेअर पण केले गेले. एके काळी शाळेच्या वर्गात घरचे डबे एकत्र गोपाळकाळा असे शेअर करणा-या वर्ग मित्र-मैत्रिणींनी इतक्या वर्षांनी एकत्र अशी सकाळची न्याहरी व दुपारच्या स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. शेवटी सर्वांचे आभार मानून गोड समारोप केला. जणू आयुष्यातील उर्वरित काळासाठी आनंदी स्मृतींचे एक टॉनिक, संजिवनी बुस्टर डोस घेऊन सर्व जण दिवसभराच्या कार्यक्रमानंतर परत कधीतरी दुसरा असाच कार्यक्रम करु असे एकमेकांना वचन देऊन आपापल्या घरी परतले.
यावेळी सौ .सुनीता तावडे .(नाशिक सौ .इंदायनी आगलावे .सौ .उषा म्हात्रे .सौ .संजीवनी चोरगे .सौ .संगीता पाटील .सौ .कांचन माळी (जळगाव ).सौ.जयश्री पाटील.सौ .वंदना .सौ .जयश्री .सौ. वृंदावनी कवले .सौ .प्रतिमा कोळी कीर्तिनिधी ठाकूर .कैलास पिंपरे .नरेश पाटील.बळीराम पाटील .आशिष ठाकूर .कांता भोईर.संदीप माळी .दीपक ठाकूर.पत्रकार सुनील ठाकूर .गणेशभोईर (घारापुरी ).प्रवीण पाटील .विनोद पाटील.कैलास पाटील.गंगाराम थळी .गुरुनाथ ठाकूर .कैलास ठाकूर .सुनील पाटील .परशुराम जोशी .जनार्दन खार पाटील .अविनाश पाटील .वामन पाटील आदी मित्र उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत