बिबडे, पापडांचे नियोजन असेल तर २०पर्यंत थांबा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळाची शक्यता
बिबडे, पापडांचे नियोजन असेल तर २०पर्यंत थांबा
जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळाची शक्यता
लेवाजगत न्यूज जळगाव -मार्च महिन्यात उन्हाळा लागल्याने महिला बिबडे आणि पापड तयार करण्याच्या कामाला लागल्या आहेत. या आठवड्यात पापडांचे नियोजन असेल तर २० मार्चपर्यंत हे नियोजन पुढे ढकलावे लागेल. कारण येत्या १३ ते २० मार्च दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे वादळ, वारे, ढगाळ वातावरणामुळे पापडांचे नियोजन बिघडू शकते.
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाली आहे. दोन दिवसात हे वातावरण निवळणार असून पुन्हा १३ मार्चपासून राज्यात वादळी पाऊस होईल. त्यात जळगावसह धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात अधिक प्रभाव असेल. १३ ते १६ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस होवू शकतो. त्यानंतरचे चार दिवस जिल्ह्यात स्थानिक पातळीवर वातावरण निर्मिती होऊन अवकाळी पाऊस शक्य आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत