सावदा शहरात आमोदा भिकनगाव महामार्गावर गतिरोधक बसावा
सावदा शहरात आमोदा भिकनगाव महामार्गावर गतिरोधक बसावा
लेवाजगत न्यूज आमोदा-भिकनगाव या महामार्गाचे नव्यानेच रुंदीकरण झाल्याने शहरातील हद्दीतून या मार्गाने रावेर, पाल,बऱ्हाणपूर व भुसावळ या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या या वाढली आहे. या मार्गावर शहर हद्दीत गतिराेधक नसल्याने वाहने तसेच अवजड वाहनेही भरधाव वेगाने जातात. त्यामुळे किरकोळ अपघात हाेत असल्याने या मार्गावर काही ठिकाणी गतिराेधक बसवण्याची मागणी हाेत आहे. रुंदीकरणानंतर गेल्या काही दिवसांत या मार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे.
Youtube-▶️आपण ज्या धर्मात जन्म घेतला त्याला वेळ देऊ शकत नसाल तर आपण धर्माचे व देवाचे गुन्हेगार आहात- शास्त्री भक्ती किशोरदासजी यांनी हिंदू नववर्षानिमित्त निघालेल्या ग्रामप्रदक्षिणा समारोपप्रसंगी व्यक्त केले.यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,सपोनि जालींदर पळे चंद्रशेखर पाटील,लाला चौधरी,शिवाजी भारंबे उपस्थित होते.
त्यामुळे या मार्गावरील विश्रामगृहाजवळ टी पॉइंट व साईबाबा मंदिराजवळ असलेल्या वाय पॉईंट ठिकाणी तातडीने नियमानुसार गतिरोधक बसवावेत. तसेच सावदा शहरातील आठवडे बाजारातून जाणाऱ्या मार्गावर तिहेरी अपघात झालेल्या ठिकाणी व सोमवार गिरी मढीमागे असलेल्या पाच मार्ग एकत्र येत असलेल्या ठिकाणी येतात. त्यामुळे या ठिकाणांवरही गतिरोधक बसवावेत. जेणेकरून होणारे छाेटे-माेठे अपघात टळतील, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम, पालिकेकडे नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत