Contact Banner

मुहुर्ताच्या सौद्यात सांगलीत हळदीला साडेअकरा हजाराचा सर्वोच्च दर

 

मुहुर्ताच्या सौद्यात सांगलीत  हळदीला साडेअकरा हजाराचा सर्वोच्च दर


मुहुर्ताच्या सौद्यात सांगलीत  हळदीला साडेअकरा हजाराचा सर्वोच्च दर

वृत्त संस्था सांगली- गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर सांगली बाजारात राजापुरी हळदीला क्विंटलला ११ हजार ५०० रूपये दर मिळाला. यंदाच्या हंगामातील हळदीचे सौदे आजपासून सुरू झाले असून मुहुर्ताचा सौदा पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते काढण्यात आला.

Youtube-▶️आपण ज्या धर्मात जन्म घेतला त्याला वेळ देऊ शकत नसाल तर आपण धर्माचे व देवाचे गुन्हेगार आहात- शास्त्री भक्ती किशोरदासजी यांनी हिंदू नववर्षानिमित्त निघालेल्या ग्रामप्रदक्षिणा समारोपप्रसंगी व्यक्त केले.यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,सपोनि जालींदर पळे चंद्रशेखर पाटील,लाला चौधरी,शिवाजी भारंबे उपस्थित होते.

https://youtu.be/poea-0F871A


       गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर नवीन हळदीचे सौदे काढण्याचा प्रघात असून आज अधिक्षक तेली यांच्या हस्ते मे. बी. बी.यलीगार या दुकानात सौदा काढण्यात आला. यावेळी कर्नाटकातील हिडकल ता. रायबाग येथील शेतकरी पिराप्पा चनाप्पा व्हसट्टी यांच्या हळदीला ११ हजार ५०० रूपये प्रतिर्क्विटल असा दर मिळाला. यु.के. खेमजी आणि कंपनीने ही हळद खरेदी केली.आज काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये कमाल साडेअकरा ते किमान साडेसहा हजार असा दर मिळाला. पहिल्याच दिवशी सरासरी हळदीचा क्विंटलचा दर साडेआठ हजार असल्याचे  बाजार समितीतून सांगण्यात आले. यावेळी बाजार समितीचे प्रशासक  उप निबंधक मंगेश सुरवसे यांनी अधिक्षक तेली यांचे स्वागत केले. यावेळी सचिव महेश चव्हाण, अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर देसाई, खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष सतिश पटेल, गोपाळ मर्दा, प्रशांत पाटील मजलेकर, आर.टी. कुंभार आदीसह  व्यापारी, खरेदीदार शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.