Contact Banner

चाई पडणे-डॉ. सुशांत शशिकांत पाटील

 

चाई पडणे-डॉ. सुशांत शशिकांत पाटील

चाई पडणे-डॉ. सुशांत शशिकांत पाटील

     आजकाल सर्वांना च केसांच्या तक्रारी दिसू लागल्या आहेत. त्यात चाई पडणे म्हणजे डोक्यावर अचानक एखाद्या ठिकाणी साधारण  रुपयाच्या आकाराचा गोल चट्टा पडतो. त्यातील सर्व केस गळून गेलेले असतात. यास व्यवहारात चाई पडणे तर आयुर्वेद निदानात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. याचे ढोबळमानाने दोन प्रकार केले जातात. एकात फक्त त्या ठिकाणचे केस जातात, तर दुसऱ्या प्रकारात केसांच्या मुळाखालील त्वचेत खड्डा पडलेला असतो. पहिला प्रकार बरा करायला सोपा आहे, तर खड्डा पडलेला असल्यास तो प्रकार लवकर बरा होत नाही. ही चाई शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरही पडू शकते, त्यामुळे काहींना ती डोक्यावर, दाढी, मिशा किंवा सर्वागावर कुठेही आढळते.

चाई पडणे-डॉ. सुशांत शशिकांत पाटील



    दाढी अथवा डोके येथील केस गळून पडल्याने तेथे वर्तुळाकार असे स्थानिक टक्कल दिसते त्याला 'वर्तुळी अलोमता' असे म्हणतात. त्याचे निश्चित कारण अज्ञात असले, तरी भावनिक संक्षोभामुळे हे होत असावे असे मानतात. केशमूलाच्या भोवती दाहयुक्त सूज आल्यामुळे तेथे पोषक द्रव्यांची उणीव उत्पन्न होते व त्यामुळे केसाला अन्नपुरवठा होत नसल्यामुळे केस गळून पडून पुन्हा उगवत नाहीत.  

     सामान्य विकारात गोल किंवा लंबगोल आकाराचे लहान लहान चमकणारे टक्कल दिसू लागते. त्याच्या भोवतालच्या जागेतील केस उद्‌गारचिन्हासारखे  टोकाशी जाड व मुळाशी बारीक असे दिसतात. सुरूवातीस गळून पडलेले केस पुन्हा उगवतात परंतु पुढे ही उगवण बंद पडते. एके ठिकाणी चाई उत्पन्न होत असता दुसऱ्या ठिकाणच्या चाईतील केस उगवू लागल्याचेही दिसते. तेथे नव्याने आलेले तुरळक केस बारीक, पांढरे अथवा पिवळसर रंगाचे असतात.

   तुमच्या दाढीवर पॅच दिसून येत आहेत का? ही समस्या तुमच्या एकट्याची नाही. बऱ्याच पुरुषांना डोक्यावर जसे टक्कल पडते अगदी त्याप्रकारे दाढीचे केस गमावण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. सर्व वयोगटातील अनेक पुरुषांचे वेगवेगळ्या अंतराने दाढीचे केस अनपेक्षितपणे गळतात. याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असते.

     दाढीचे केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. बहुतेकदा रोगप्रतिकारक शक्तीच्या परिणामामुळे या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. दाढीचे केस गळणे आणि ठराविक जागेवर पॅच दिसणे या ऑटोइम्यून डिसऑर्डरला वैद्यकिय भाषेत अलोपेशिया बार्बी (Alopecia barbae ) असे म्हणतात. जर तुम्ही वेळीच यावर योग्य उपचार केले तर त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असते.

       चाई पडणे अथवा इंद्रलुप्त आजारावर अनेक आयुर्वेद उपचार उपलब्ध आहेत. 

डॉ. सुशांत शशिकांत पाटील BAMS DYA सर्वद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय,विद्या नगर, भुसावळ रोड,नवीन नगर पालिका जवळ,फैजपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.