जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा संस्थानतर्फे गरीब व गरजू ७० शालेय विद्यार्थ्यांना अलिबाग रायगड येथे मोफत ७० सायकलचे वाटप
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा संस्थानतर्फे गरीब व गरजू ७० शालेय विद्यार्थ्यांना अलिबाग रायगड येथे मोफत ७० सायकलचे वाटप
उरण (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सुनील ठाकूर )अलिबाग येथे जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज, जिल्हा रत्नागिरी तर्फे शैक्षनिक उपक्रमांतर्गत गरिब व गरजू ७० शालेय विद्यार्थ्यांना ७० मोफत
सायकलचे वाटप जे. एस. एम. कॉलेज मैदान, अलिबाग ,रायगड येथील पादुका व दर्शन सोहळाप्रसंगी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मा. श्री. महेन्द्र दळवी - आमदार अलिबाग मुरुड तालुका मतदार संघ,मा. श्री. प्रशांत नाईक नगराध्यक्ष अलिबाग नगरपालिका,मा. सौ. माणशी म्हात्रे - उपनगराध्यक्षा,अलिबाग नगरपालिका,मा. श्री. अनिल चोपडा मा. नगरसेवक, मा. सौ. प्रिया वेलकर - मा. नगरसेविका,मा. सौ. संजना गिर - मा. नगरसेविका,मा. सौ. अश्विनी पाटील - मा. नगरसेविका,मा. सौ. रुपाली ठोसर - मा. नगरसेविका, मा. श्री. सुरेंद्र म्हात्रे - मा. जिल्हा शिवसेना प्रमुख रायगड,मा. सौ. चित्राबाई पाटील- जिल्हा प्रमुख शे. का. प.,मा.श्री पंडितशेठ पाटील - शे का प.मा. श्री. राज म्हात्रे - उद्योगपती अलिबाग, मा. श्री. हरीचंद्र वाजंत्री - सामाजिक कार्यकर्ते रोहा, मा. श्री गणेश मोरे - मराठवाडा पीठ प्रमुख श्री संप्रदाय, मा. श्री दिपक खारुडे - मुख्य नानिजपीठ सहाय्यक प्रमुख ,विविध प्रसिद्धी माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.
या पादुका दर्शन सोहळा प्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजतर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. " जगदगुरु श्री"च्या पादुकांचे आगमन, आरती, सामाजिक उपक्रम सोहळानंतर गुरुपूजन, प्रवचन, उपासक दिक्षा दर्शन, पुष्पवृष्टि असे अनेक कार्यक्रम योवेळी संपन्न झाले.
आजच्या पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात जगदगुरु श्री"च्या सिद्ध पादुकांनसमवेत भव्य दिव्य शोभा यात्रेने विविध कला पथकांच्या उपस्थीत करण्यात आली.
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा महाराष्ट्रात खूप मोठा भक्त वर्ग असून तत्यांच्या हितचिंतकांनी संख्या खूप मोठी आहे. जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक विविध सामाजिक उपक्रम सूरु आहेत. कोरोना काळात मा. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपयाची आर्थिक मदत,मा. पंतप्रधान सहायता निधीसाठी बावन्न लाख रुपयांची आर्थिक मदत, रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाला १० लाखाचा धनादेश, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला १५ लाखाचा धनादेश जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या माध्यमातून करण्यात आले.जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनमानसामध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे. सप्टेंबर २०१६ ते ११ मार्च २०२३ या कालावधीत ३७ मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले. ब्लड ईन नीड या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या रुग्णांना रक्तांची गरज भासते त्या त्या ठिकाणी हॉस्पीटल येथे जाउन आजपर्यंत १८००० पेक्षा जास्त रुग्णांना रक्त देउन त्यांचे प्राण वाचविले आहेत. महापूर, भूकंप आदि नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना महामारीच्या काळातही अखंडपणे संस्थानतर्फे रुग्णसेवा सुरू होती. आज संस्थानतर्फे ३७ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत आहेत. या शिवाय समाज जागृती लोक प्रबोधन, व्यसन मुक्ती, संस्कृतीचे संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विविध उपक्रमही सुरू आहेत.महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी असते. तशीच मोठ्या प्रमाणात गर्दी अलिबाग तालुक्यातील जे. एस. एम. कॉलेज मैदान, येथे पाहावयास मिळाली.जवळ जवळ १८००० ते २०००० भाविक भक्तांची येथे उपस्थिती होती.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनचे सर्व पदाधिकारी ,जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडचे सर्व पदाधिकारी सदस्य, स्व स्वरूप संप्रदायचे सर्व भक्तगण, शिष्य वर्ग, उपासक यांनी विशेष मेहनत घेतली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत