भरधाव कारची ओव्हरटेकच्या नादात दुचाकीला धडक दुचाकीस्वराचा मृत्यू, कारसह कारचालक ताब्यात
भरधाव कारची ओव्हरटेकच्या नादात दुचाकीला धडक
दुचाकीस्वराचा मृत्यू, कारसह कारचालक ताब्यात
लेवाजगत न्यूज जळगाव-ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार रमेश मदन राठोड (वय-४५, रा. रामदेववाडी) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी रामदेववाडीजवळील टेकडीजवळ घडली. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे रमेश राठोड हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी २१ मार्च दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ते दुचाकीने जळगावकडे येत होते. याचवेळी पाचोर्याकडून (एमएच १९ डीव्ही ७५१३) क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत होती. कारचालक दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करीत होता. ओव्हरटेक करण्याच्या नादात कारचालकाने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश राठोड हे गंभीररित्या जखमी होवून बेशुद्ध झाले. त्यांना लागलीच ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवित असतांना रस्त्यातच त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन विवाहित मुली असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप पाटील व स्वप्निल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत. कारचालकासह कार ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत