Contact Banner

फैजपूर येथील श्रीराम जन्मोत्सव समिती अध्यक्षपदी नीरज झोपे



 फैजपूर येथील श्रीराम जन्मोत्सव समिती अध्यक्षपदी नीरज झोपे

लेवाजगत न्युज फैजपूर:-येथे श्रीराम सार्वजनिक जन्मोत्सव समितीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नीरज झोपे यांची निवड करण्यात आली. श्रीराम मंदिर सभागृहात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत श्रीराम सार्वजनिक जन्मोत्सव समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी नीरज झोपे, उपाध्यक्षपदी यश चौधरी, खजिनदार रितेश चौधरी, सचिव मयूर भारंबे, सदस्य सचिन कोळी, सदस्य सचिन चौधरी यांच्यासह इतर रामभक्तांची निवड करण्यात आली. या श्रीराम सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामुळे शहरात रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.