Contact Banner

गुरुवारपासून दोन दिवस ३० गाड्या रद्द भुसावळ कटनी इटारसी मेमो ,देवळाली एक्सप्रेस बंद .

 

गुरुवारपासून दोन दिवस ३० गाड्या रद्द  भुसावळ कटनी इटारसी मेमो ,देवळाली एक्सप्रेस बंद .

गुरुवारपासून दोन दिवस ३० गाड्या रद्द

भुसावळ कटनी इटारसी मेमो ,देवळाली एक्सप्रेस बंद .

लेवा जगत न्यूज भुसावळ -सुरक्षा आयुक्त गुरुवार व शुक्रवार ३०व ३१मार्च दोन दिवस भुसावळ ते भादली चौथ्या लाईनची चाचणी करणार आहेत. या काळात यार्ड रिमोल्डिंग मुळे रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. परिणामी दोन दिवसात तब्बल ३९ रेल्वे गाड्या रद्द तर १७गाड्यांचे मार्क बद्दल व सहा गाड्या या शॉर्ट टर्मिनस केले आहेत. रद्द गाड्यांमध्ये भुसावल कटनी, इटारसी मेमो, देवळाली, सुरत ,महाराष्ट्र एक्सप्रेस चा समावेश आहे.त्यामुळे या दोन दिवसात प्रवाशांचे हाल होणार आहेत. भुसावल भादली या मार्गावरील चौथ्या लाईनची चाचणी सुरक्षा आयुक्त यांच्यामार्फत होणार आहे. एकाच ब्लॉक मध्ये तीन कामे रेल्वे प्रशासनातर्फे केली जाणार आहे.दोन दिवस ब्लॉक असल्याने त्याचा या मार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे. हे काम झाल्यानंतर भुसावळ रेल्वे यार्डातून निघणाऱ्या मालगाड्या थेट पश्चिम रेल्वे मार्गाला जातील वेग वाढेल व यामुळे मेन लाईन चा खोळंबा कमी होणार आहे.

     रद्द झालेल्या गाड्या अशा-

रद्द झालेल्या गाड्यांमध्ये २९ मार्चला पुणे अमरावती ३० मार्च अमरावती पुणे ,३० व ३१  या दिवशी सुटणारी सुरत अमरावती एक्सप्रेस ३१ मार्च व १ एप्रिल ला सुटणारी अमरावती सुरत एक्सप्रेस, भुसावळ दौंड,३० - दौंड भुसावळ एक्सप्रेस, पुणे भुसावळ एक्सप्रेस, अहमदाबाद नागपूर प्रीमियर एक्सप्रेस, पुणे नागपूर एक्सप्रेस, मुंबई जबलपूर एक्सप्रेस ,बडनेरा भुसावळ मेमो, भुसावळ इटारसी मेमो, सुरत भुसावळ एक्सप्रेस ,भुसावळ कटनी एक्सप्रेस  ३१- रोजी रद्द झालेल्या गाड्यांमध्ये भुसावळ पुणे एक्सप्रेस, भुसावळ बडनेरा मेमो, भुसावळ सुरत एक्सप्रेस, देवळाली भुसावळ एक्सप्रेस, भुसावळ देवळाली एक्सप्रेस, कटनी भुसावळ एक्सप्रेस, नागपूर पुणे एक्सप्रेस, भुसावळ नागपूर मेमो, नागपूर भुसावळ मेमो, वर्धा भुसावळ एक्सप्रेस, गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस तर २९ रोजी जबलपूर मुंबई एक्सप्रेस, नागपूर अहमदाबाद एक्सप्रेस या गाड्या रद्द झाले आहेत.

   शार्ट टर्मिनेट गाड्या     

   सुरत भूसावल १९००७  ही गाडी २९ व ३० या दिवशी पाळधी पर्यंत येईल तर १९००८ ही गाडी ३० व ३१ असे दोन दिवस धरणगाव येथूनच सुटेल नंदुरबार भुसावळ ही गाडी ३९ व ३१ मार्चला धरणगाव पर्यंत येईल तर भुसावळ नंदुरबार ही गाडी दोन्ही दिवस पाळधी येथून सुटेल सुरत भुसावल १९००५ ही गाडी नरडाणा पर्यंत येईल तर भुसावल सुरत १९००६ ही गाडी नरडाणा येथून सुटेल प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या गाड्यांच्या मार्गात बदल

 निजामुद्दीन-एर्नाकुलमंगला एक्स्प्रेस अप-डाऊन मार्गावरील ही गाडी ३० मार्चला निजामुद्दीन येथून निघेल. ही गाडी रतलाम, वडोदरा, वसई रोड, पनवेल मार्गे धावेल. गाडी (१२७१५) नांदेड -अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ही नांदेडहून ३० व ३१ रोजी अकोला-भुसावळ, खंडवा मार्गे जाईल. सचखंड एक्स्प्रेस २९ व ३१ या दिवशी खंडवा, भुसावळ, अकोला, पसुर मार्गे जाईल. एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस (१२६१७) ३० रोजी एर्नाकुलमहून पनवेल, वसई रोड, वडोदरा, रतलाम, संत हिरडाराम नगर मार्गे धावेल. (१२८४४) अहमदाबाद -पुरी एक्स्प्रेस अहमदाबादहून ३० ला सुटेल. ती रतलाम-भोपाळ, इटारसी, नागपूर मार्गे जाईल. तर अहमदाबाद-प्रयागराज (२२९६७) गाडी ३० रोजी सुटेल. ती रतलाम, भोपाळ, इटारसी मार्गे धावेल. अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेस (१२६५५) ३० मार्चला सुटेल. ती रतलाम, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ मार्गे जाईल. (१२६५६) चेन्नई- अहमदाबाद एक्स्प्रेस चेन्नईहून ३० ला निघेल. ती भुसावळ कॉर्ड लाइन, खंडवा, इटारसी, भोपाळ, रतलाम मार्गे जाईल. (१९०४५) सुरत-छपरा एक्स्प्रेस ३० रोजी सुरतहून सुटेल. वडोदरा, रतलाम, भोपाळ, इटारसी मार्गे जाईल. (२२६८८) बनारस-म्हैसूर एक्स्प्रेस ३० रोजी बनारसहून अकोला, पसुर, अंकाई, मनमाड, अंकाई मार्गे सुटेल. (१२६२९ ) यशवंतपूर -निजामुद्दीन एक्स्प्रेस ३० रोजी यशवंतपूर येथून सुटेल. ती कल्याण, वसई रोड, वडोदरा, रतलाम, संत हिरडाराम नगर मार्गे जाईल. (१२५३४) मुंबई - लखनौ पुष्पक एक्स्प्रेस ३१ मार्चला मुंबईहून सुटेल. ती कल्याण, वसई रोड, वडोदरा, रतलाम, संत हिरडाराम नगर मार्गे जाईल. (११४२७) पुणे-जे एसआयडीआय एक्स्प्रेस ही ३१ रोजी पुण्याहून निघेल. ती लोणावळा, वसई रोड, वडोदरा, रतलाम, संत हिरडाराम नगर, बिना, कटनी या मार्गे जाईल. (१५०२९) गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस गोरखपूर येथून ३० रोजी सुटेल व बिना, संत हिरडाराम नगर, रतलाम, वडोदरा, वसई रोड, लोणावळा मार्गे जाईल. (२२६८७) म्हैसूर - बनारस एक्स्प्रेस  ३० रोजी बनारस येथून निघेल. ती वाडी, दौंड, पुणे, लोणावळा, वडोदरा, रतलाम, संत हिरडाराम नगर, बिना, कटनी या मार्गे जाईल. (१९४८३) ही बरौनी- अहमदाबाद गाडी ३१ रोजी निघेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.