Contact Banner

सावद्यातील उन्हाळे परिवाराचा स्तुत्य सेवार्थ उपक्रम

सावद्यातील उन्हाळे परिवाराचा स्तुत्य सेवार्थ उपक्रम


 सावद्यातील उन्हाळे परिवाराचा स्तुत्य सेवार्थ उपक्रम 

लेवाजगत न्यूज सावदा -येथील लक्ष्मीनारायण नगरातील रहिवासी विजय दत्तात्रय उन्हाळे (मूळ गाव तांदळवाडी )यांनी त्यांचे वडील स्व. दत्तात्रय किसनराव उन्हाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्य वीस  फायबर खुर्च्या व  हिरवे नेट कोणतेही भाडे न घेता मोफत १३ दिवस वापरासाठी देण्याचा  मनोसंकल्प म्हणून नुकत्याच  त्यांच्या पुण्यतिथी निमित्त लोकार्पण करण्यात आल्या. 

      या साठी  खुर्च्याचे उन्हाळे परिवारातील उषाबाई दत्तात्रय उन्हाळे , प्रतिभा संजय सपकाळे ( मुलगी ) जळगाव ,ज्योती वासुदेव पाटील (इच्छापुर)  व नातींच्या हस्ते खुर्च्यांचे लोकार्पण करण्यात आले.शहरात कोठेही कोणत्याही  व्यक्तीचे निधन झाल्यास त्या कुटूंबात दुःखात सहभागी होऊन त्या दुखद कुटूंबियांना कोणत्याही प्रकारे माणुसकी या नात्याने मदत व्हावी या उद्देशाने येथील सेवाभावी असलेल्या उन्हाळे परिवाराने  स्व. दत्तात्रय किसनराव उन्हाळे हे नेहमी लोककार्यात व धर्म कार्यात सर्वप्रथम  सहभागी होत होते. 

      स्व दत्तात्रेय उन्हाळे यांचा  वारसा पुढे चालवण्याकरता हे समाज उपयोगी साहित्य उन्हाळे परिवार यांनी उपलब्ध करून दिले आहे. हा उपक्रमा बाबत सर्वत्र चर्चा आहेत.संपर्क :-( जय गजानन डेअरी दुर्गा माताचौक मो; 93721 02443)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.