Contact Banner

गायीने दिला दोनमुखी वासराला जन्म ...! वासराचा मृत्यु ; डॉक्टरांचे शरतीचे प्रयत्न

 

गायीने दिला दोनमुखी वासराला जन्म ...!
वासराचा मृत्यु ; डॉक्टरांचे शरतीचे प्रयत्न

लेवाजगत न्युज वरुड ( तालुका प्रतिनीधी ):- शहरामध्ये स्थित चौकामध्ये एक बेवारस ( मोकाट ) गाय प्रस्तुती वेदनेने तळफळत असताना नागरीकांना आढळून आली. सदर घटनेची माहीती गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष चंदु कडू यांना दिल्यानंतर गाईचे रेस्कृ करुन दोन मुख असलेले मृत कालवढ काढण्यात डॉक्टराना यश आले.

मिळालेल्या माहीतीनुसार शहरातील अतिगजबजलेल्या केदार चौकामधे एक मोकाट गाय प्रस्तुतीवेनेने तळफळत असल्याची माहीती स्थानिक नागरीकांनी शहरातील गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेला दिली.

  गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेच्या वतीने गायीला रेस्कु करून आणण्यात आले त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गायीचे रेस्कुकरत गायीच्या पोटातुन दोन मुख असलेल्या कालवडला काढण्यात आले यामध्ये कालवडचा मृत्पु झाला असुन गाय मात्र सुखरूप असल्याची घटना सोमवारच्या रात्री घडली असुन गायीचे प्राणवाचवल्याबद्दल गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष चंदु कडू व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर  मृत कालवडवर हींदुरितीरिवाजाप्रमाने दफनविधीकरण्यात आला हे मात्र विषेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.