होळीरे होळी, पुरणाची पोळी-डॉ.अनिता बेंडाळे,नाशिक
होळीरे होळी, पुरणाची पोळी-डॉ.अनिता बेंडाळे,नाशिक
होळी हा सण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये मोठया उत्साहाने साजरा होतो हा एक रंगाचा सण आहे,त्याला होलिका दहन, किंवा होळी पौर्णिमा, तर काही ठिकाणी हुताशनी महोत्सव साजरा होतो.कोकणात शिमगोत्सव साजरा होतो .होळी सणाला नेपाळी लोकांचा सण असेही म्हणतात. सत्याचा असत्याचा विजय,वाईटावर चांगले पणा विजय हे या सणाचे प्रतीक आहे.हा सण 2 ते 3 दिवसांचा सण आहे.या उत्सवा बद्दल पुराणात अनेक कथा आहेत.कृष्णाने पुतनेचा वध याच दिवशीं केला.शंकराने त्याच्या तपश्चर्यात बाधा आणणाऱ्या मदनाला याच दिवशी भस्मसात केले.प्रल्हाद ला
जाळण्यासाठी आलेल्या राक्षसीचे उच्चाटनही याच दिवशी झाले.अश्या प्रकारे होलिका उत्सवाचा सबंध देवतांच्या पराक्रमाशी प्रस्थापित झालेला आहे. सध्या होली कोत्सव हा सामाजिक उत्सव झालेला आहे. होळी सणा दिवशी सगळे लोक वाद विवाद ,द्वेष, राग,विसरून होलिका दहन साठी एकत्र येतात. होळीसाठी लागणारी लाकडं गावातील सर्व लोक मिळून जमा करतात व सर्व स्त्रिया एकत्र येऊन नैवेद्य, पूजेची सर्व तयारी करतात.होळीची पूजा, आरती करून होळीची प्रदक्षिणा घालतात,लहान मुले "होळी रे होळी,पुरणाची पोळी" असे ओरडतात.घरगुती स्वरूपात तो साजरा करताना आपले अंगण शेणाने सारवून
रांगोळ्यांनी सुशोभित करावे.त्यानंतर एरंडाची एक छोटी फांदी उभी करून तिच्या भोवती गोवऱ्या रचून ती कापुराने प्रज्वलित करावी.नंतर त्या होलिकेची पंचोपचार पूजा करून तिला पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण करून मंत्र पुष्प वाहावे.
त्यानंतर उजव्या हाताने बोंबा मारून तिला आपली इडा पिडा जाळून नवीन प्रकाश,नवी स्फुर्ती देण्याची विनंती करावी.रात्री गीत,वाद्य,नर्तनादी कार्यक्रमानी काही काळ जागरण करावे.दुसऱ्या दिवशी सकाळी शांत झालेल्या होळीवर दूध शिंपडून होळीची रक्षा सर्वांगास लावली.यालाच धुली वंदन म्हणतात.त्यानंतर स्नान करून आपल्या नित्य कर्मास लागावे. होळी हा सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सुद्धा साजरा केला जातो.होळीचा सण आपल्याला एक चांगली शिकवण देतो.ती म्हणजे अंधाऱ्या समयी टिकून राहायचे आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणांची वाट पहायची असते म्हणजे च जुनी दुःख विसरून येणाऱ्या सुखा साठी प्रयत्न करणे.प्रत्येक दिवसा नंतर रात येतेच त्याप्रमाणे दुःख नंतर सुख येतेच.फाल्गुन वद्य पंचमीला रंग पंचमी म्हणतात.या दिवशी मित्र परिवार व आप्तेष्टांवर रंगाची उधळण करून रंगोत्सव साजरा करून देहभान विसरून रंगात रंगतात.काही ठिकाणी फुलांच्या पाकल्यांनी रंगपंचमी साजरी करतात.काही ठिकाणी जल वर्षाने साजरी होते.पुरातन काळात लोक रंग म्हणून गुलाल,हळद,कुंकू,चंदनाची पावडर वापरत,पण आज रंगीबेरंगी रंग,पाण्याचे फुगे,वेगवेगळ्या पिचकाऱ्या वापरून रंगपंचमी सण साजरा केला जातो.
डॉ.अनिता बेंडाळे,नाशिक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत