आंतरजातीय विवाह केल्यास सरकार देणार दहा लाख रुपये
आंतरजातीय विवाह केल्यास सरकार देणार दहा लाख रुपये
वृत्तसंस्था राजस्थान -राजस्थान सरकारने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणारी आर्थिक मदत दुप्पट केली आहे. आतापर्यंत ५ लाख रुपये मिळत होते. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आता आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला संयुक्तपणे १० लाख रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली.
या योजनेंतर्गत ५ लाख मुदत रुपये ठेव योजनेच्या रूपात, तर ५ लाख संयुक्त खात्यात जमा केले जातील. राजस्थान सरकारने ही योजना राज्यात २००६ मध्ये सुरू केली होती. तेव्हा ५० हजार रुपये दिले जात होते. एप्रिल २०१३ मध्ये ही आर्थिक मदत वाढवून ५ लाख केली होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही आर्थिक मदत केली जाते. यात राज्य सरकारचे योगदान ७५ टक्के असते. २५ टक्के रक्कम केंद्र सरकार देते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत