Contact Banner

जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष : आ.एकनाथराव खडसे

Jalgaon-district-illegal-businesses-police-neglect- MLA-Eknathrao-Khadse


 जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष : आ.एकनाथराव खडसे

लेवाजगत  न्यूज रावेर -जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

    राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा तर्फे रावेर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच ,उपसरपंच तसेच ग्राम पंचायत सदस्य,विकासोचे चेअरमन ,व्हाचेअरमन तसेच सदस्य यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम रावेर शहरातील सैनिक हॉलमध्ये घेण्यात आला. यावेळी आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, दोन नंबरचे धंदे बंद झाले नाही तर उलट दोन नंबर वाल्यांकडून हप्ते वाढवुन घेतले याकडे जिल्हाचे पोलिस अधिक्षक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खडसे यांनी रावेरात केला आहे. तसेच आगामी कृषी उपन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीनी घेतला आहे.

    यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील ,माजी आमदार अरुण पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील,निळकंठ चौधरी,माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,

ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख ,राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रेखा चौधरी,मुरलीधर तायडे,रमेश पाटील, प्रकाश पाटील,शकुंतला महाजन ,सोपान पाटील ,दिपक पाटील ,वंदना चौधरी,सचिन पाटील,प्रल्हाद बोंडे,मायाबाई बार्‍हे आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.