Contact Banner

कोचूरचे संजय पाटील बाजार समिती निवडणुकीतून घेणार राजकारणात ‘एंट्री’ !

Kochur-Sanjay-Patil-market-committee-will-take-‘entry’-into-politics!


 कोचूरचे संजय पाटील बाजार समिती निवडणुकीतून घेणार राजकारणात ‘एंट्री’ !

लेवाजगत न्यूज सावदा -येथून जवळच असलेल्या कोचूर येथील प्रगतीशील शेतकरी तथा मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे संजय ब्रिजलाल पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक आखाड्यात उतरणार असून यामुळे परिसरात वातावरण निर्मित झाले आहे.

    कोचूर येथील ख्यातनाम व्यक्तीमत्व असणारे संजय ब्रिजलाल पाटील यांनी आजवर राजकीय वा सहकार क्षेत्रातील कोणतीही निवडणून लढविलेली नाही. मात्र अगदी ग्रामपंचायतीपासून ते आमदारकीपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये कोचूरसह परिसरात ते किंगमेकर म्हणून ओळखले जातात. ते स्वत: पडद्याआड असले तरी त्यांची भूमिका ही कायम महत्वाची मानली जाते. या पार्श्‍वभूमिवर, ते या वर्षी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सहकारातील आपली राजकारणाची इनिंग सुरू करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून येत्या दोन-तीन दिवसात ते आपला उमेदवारी अर्ज व्यापारी मतदार संघातून दाखल करणार आहेत.

   संजय ब्रिजलाल पाटील हे कोचूरच नव्हे तर तालुक्यातील मोठे आणि प्रगतीशील शेतकरी आहेत. मराठा समाजातील मान्यवर असणार्‍या पाटील यांना समाजात देखील मोठा मान सन्मान आहे. यामुळे ते आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सहकारात एंट्री करणार असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

    वास्तविक पाहता संजय पाटील यांना कोणत्याही पॅनलमध्ये अगदी सहजपणे स्थान मिळू शकते. तथापि, ते स्वत: नेमके कुणाला प्राधान्य देतात ही बाब देखील लक्षणीय मानली जात आहे. याबाबत ते येत्या काही दिवसांमध्ये आपले पत्ते खुले करू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.