Contact Banner

राष्ट्रीय लेवा अभिमान पुरस्कार व पुस्तिके साठी प्रस्ताव पाठवा -लेवाजगत समूहाचे आवाहन

राष्ट्रीय लेवा अभिमान पुरस्कार  व पुस्तिकेसाठी प्रस्ताव पाठवा -लेवजगत समूहाचे आवाहन


राष्ट्रीय लेवा अभिमान पुरस्कार  व पुस्तिके साठी प्रस्ताव पाठवा -लेवाजगत समूहाचे आवाहन 

प्रतिनिधी सावदा -येथील लेवा जगत समूहातर्फे राष्ट्रीय लेवा अभिमान पुरस्कार २०२३ व लेवा अभिमान गौरव पुस्तिका २०२३ साठी ३० मे २०२३ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

    देशातील व्यवसाय, नोकरी,कामानिमित्त विखुरलेल्या लेवा समाजातील साहित्य, शिक्षण, समाजसेवा, क्रीडा, कृषी, वैद्यकीय, उद्योग, कला, संस्था, संघटना, मंडळ, सरपंच, नगरसेवक, वकील, वृक्ष संवर्धन, महिला सक्षमीकरण, ग्रामसेवा, तंटामुक्ती अशा विविध क्षेत्रातील प्रौढांकरिता पुरस्कार देण्यात येणार आहेत.

     तसेच लेवा युवा अभिमान व लेवा बाल अभिमान अशा प्रौढ, युवा व बाल या तीनही गटांसाठी पुरस्कार वेग वेगळे आहे. पुरस्कारासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही . आपापल्या क्षेत्रात भरगच्च योगदान व अविरत सेवा कार्य असलेल्या सेवा व्रतींनी शून्यातून आपल्या सेवा कार्याचे विश्व निर्माण करणाऱ्यांनी आपले नामांकन प्रस्ताव ३० मे २०२३ पर्यंत "लेवा जगत समूह "ओम कॉलनी, मु.पो. सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव(महाराष्ट्र) ४२५५०२ या पत्त्यावर पाठवावे.

 अधिक माहिती करिता संपर्क -शामकांत पाटील ८९८३६८९८४४, राजेश पाटील ७०३०६४८५८७. आपले प्रस्ताव हे लेखी किंवा टाईप करून हार्ड कॉपी स्वरुपात आम्हास पोच पाठवावे, प्रथम येणाऱ्या प्रस्तावास प्रथम प्राधान्य असे नियोजन असल्याने प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावे असे आवाहन अध्यक्ष लेवाजगत समूह यांनी केले आहे.

फॉर्म-

राष्ट्रीय लेवा अभिमान पुरस्कार  व पुस्तिकेसाठी प्रस्ताव पाठवा -लेवजगत समूहाचे आवाहन






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.