Contact Banner

मोठी बातमी! नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात, मुंबईच्या समुद्र किनारी कोसळले हेलिकॉप्टर


 मोठी बातमी! नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात, मुंबईच्या समुद्र किनारी कोसळले हेलिकॉप्टर

लेवाजगत न्युज मुंबई:-

भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात घडला आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर बुधवारी नियमित उड्डाण करत असताना मुंबईच्या किनाऱ्यावर कोसळलं आहे. यात हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले असून नौदलाच्या तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असना किनाऱ्याजवळ अपघात घडला. अपघातानंतर तात्काळ शोधकार्य व बचावकार्य हाती घेण्यात आलं. त्यानंतर हेलिकॉप्टरमधील तीन कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टर कसे कोसळले व अपघात कसा झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. नौदलाकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशी माहिती वेस्टर्न नेव्हल कमांडच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.