Contact Banner

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त -तीच झाली तिची वैरी-डॉ. अनिता बेंडाळे नाशिक

 

On International-Women's-Day-She-Becomes-Her-Enemy-Dr-Anita-Bendale-Nashik

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 
-तीच झाली तिची वैरी- डॉ. अनिता बेंडाळे नाशिक


मैत्रीण आई बहिणीचं नातं

प्रेमाच्या पिठासाठी जातं

भुलवणाऱ्या लाटा च्या तळी

नराधमाच्या वासनाची बळी

युगा युगाच्या बंधनाना पाळतेस

हुंड्यासाठी स्वतः लाही जळतेस

संघर्षाची मशाल आता पेटव

रोज नवीन टास्क घेऊन नवीन

आव्हाने स्वीकारते

उंच आकाशात भरारी घेई

नवनवीन संशोधन करी

आज जणू तू हिरकणी

आव्हानांचा बुरुज सर करी

तेवणाऱ्या दिव्यातील जळणारी वात

दाह असह्य सोसून तीत चंदनापरी शांत

परिवार संकटी पडे धीरोदात्तता गुण दिसे

अबाल वृद्ध सयमांचा दृढतेने सल्ला देत असेB

तव्यवरच्या भाकरीचा घास

राबताना संसाराचा श्वास

श्वास एकच स्वतः साठी

कर्तबगार पुरुषा सारखी खंबीर

कधी न डगमगनारी कर्तृत्वाचा वसा

उचलणारी

कुटुंबाचा सारा वाहून भार किती

सोसावे लागेल

चटके तरी आणते हसु लटके


डॉ. अनिता बेंडाळे

नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.