Contact Banner

दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचे पनवेल खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी वाटप

 

पनवेल खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचे  वाटप


 दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचे पनवेल खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी वाटप

 लेवाजगत न्यूज सुनील ठाकूर उरण-सहकार्य अपंग  कल्याणकारी संस्था राज्यसचिव शिवाजी पाटील यांच्या प्रयत्नाने महानगर गॅस लिमिटेड मुंबई यांच्या सीएसआर योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम लिमिटेड मुंबई यांच्या सहकार्याने रामदास काईनकर यांच्या विट भट्टीजवळ वावंढळवाडी खालापूर येथे दिव्यांगाना आवश्यक साहित्यांचे वाटप करणयात आले.यावेळी अमिल्कोचे कमलेश यादव यांनी आपल्या प्रस्ताविक करत असताना दिव्यांगांना ह्या वस्तूंचे वाटप रायगड जिल्हयातील जवळजवळ २०००दिव्यांगांना मोटोराईज सायकल, साधी सायकल, कुबड्या, अंधांसाठी इलेक्ट्रॉनिक काठी, स्मार्टफोन, मूक बधिरांसाठी कानाची मशीन अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.  तर खालापूर पंचायत समिती विकास अधिकारी बाळाजी पुरी यांनी दिव्यांगांना कुठल्याही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मंच का वरील सर्व मान्यवर व शासकीय कर्मचारी मदत  करण्यासाठी प्रयत्न करतील व करणारच महानगर गॅस लिमिटेड मुंबईचे सी एस आर चीप मॅनेजर सुशांत राऊत दिव्यांगांना आधार देण्यासाठी अशा प्रकारच्या वस्तूंची वाटप महानगर गॅस करत आहे. तसेच जे व्यवसाय किंवा इतर काही करण्याची इच्छा असेल अशा दिव्यांगानाही सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  सांगितले तर  चौक ग्रामपंचायत सरपंच रितू ठोंबरे यांनी दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः व खालापूर तालुक्यातील इतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य सहकार्य करत असतो आणि या पुढेही करणार असे सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साईनाथ पवार यांनीही दिव्यांगाच्या समस्या योजना याविषयी मार्गदर्शन केले.तसेच १व २ मार्च २०२३ रोजी राजस्थान येथे शिवाजी पाटील यांच्या व्यवस्थापनाखाली व कर्णधार कल्पेश तवले याच्या नेतृ्वाखाली त्रिकोणी दिव्यांग क्रिकेट टी ट्वेंटी स्पर्धा खेळण्यास गेलेल्या संघाने पहिला नंबर पटकाविला म्हणुन टीम मधील प्रशिक्षक शशांक हिरवे, सुनिल पाटील,वैभव सपकाळ ,रमेश सपकाळ, विवेक कदम, रुपेश पवार ,अभिजीत मुंडे, नागनाथ घोडके यांचे अभिनंदन करण्यात आले. सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे तालुकाध्यक्ष मंगेश पारठे ,पनवेल  तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, उपाध्यक्ष रवींद्र भोईर यांची संस्थेच्या वतीने नियुक्ती  पत्र देण्यातआले. कार्यक्रमाला खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी,  विस्तार अधिकारी शैलेश तांडेल ,महादेव शिंदे ,महानगर गॅसचे पिनाकीन वाघेला, प्रियंका दळवी, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष भाजपाचे सुधीर ठोंबरे, वावंढल ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका केदारी मॅडम ,सरपंच सुहास कदम, उपसरपंच अमोल कदम, सदस्या ललिता काईंनकर ,मयुरी कांबळे,  वृशाली मांडवकर ,लोधीवली ग्रामपंचायत सरपंच पूजा तवले,  उपसरपंच समीर दळवी, सदस्य सुनिल प्रबळकर, देविदास पाटील माजी सभापती पनवेल, परशुराम माळी अध्यक्ष वारकरी संप्रदाय, माजी उपसरपंच तुकाराम गायकवाड, चावंडोली चौक, वृषाली मांडवकर, सुनील बडेकर, वैभव दिसले ,अरुण दळवी आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य रामदास काइनकर, सामजिक कार्यकर्ते किरणशेठ ठाकरे कर्जत ,काशिनाथ पारठे खालापूर , सुधीर ठोंबरे, उत्तर रायगड उपजिल्हाध्यक्ष यांनी केले हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सहकार्य अपंग  कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील खालापूर, तालुका अध्यक्ष मंगेश पारठे, तालुका सचिव कल्पेश तवले ,उपाध्यक्ष रवींद्र भोईर,  पनवेल तालुका अध्यक्ष सुनील पाटील, कुलाबा दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शशांक हिरवे, अभिजीत मुंडे ,नागनाथ घोडके, वैभव सपकाळ यांनी अथक प्रयत्न केले .तसेच हा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यासाठी पत्रकार बांधवाचेही आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.