सामाजिक बांधिलकी जपत प्रिट्टी यु. फाउंडेशनने महिलांचा केला सत्कार
सामाजिक बांधिलकी जपत प्रिट्टी यु.फाउंडेशनने महिलांचा केला सत्कार
लेवाजगत न्यूज नाशिक - येथील प्रिट्टी यु. फाउंडेशन गेल्या १० ते १२ वर्षांपासून समाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबत असते या संस्थे मार्फत विविध क्षेत्रात उल्लेख निय कामगिरी करणाऱ्या महिलां चा गेल्या ४ ते ५ वर्षांपासून ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात येत असतो
नव्या युगातील नारी मी
नव युगाप्रमाणे चालणार
नव नवीन गोष्टी करीन आत्मसात
आता मागे नाही थांबणार.
तंत्र ज्ञानाच्या या युगात
आम्ही नारी नाही कमी
केले सारे काही अवगत
उज्वल भविष्याची हमी..
मुलांनाही घडवितो आम्ही
विविध ॲप्सच्या मदतीने
सारे काही समजून देतो
आमच्यातील कौशल्याने..
या उक्तीप्रमाणे स्त्री सर्व क्षेत्रात आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे स्त्री शक्ती सर्वोच्च आहे हे तिने दाखवून दिले ,वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत अश्या स्त्रिया चा सत्कार प्रिट्टी यु. फाउंडेशन च्या अध्यक्ष डॉ. अनिता बेंडाळेयांच्या हस्तेशाल व ट्रॉफी देण्यात आले.डॉ. प्रियांका बेंडाळे,यांनी आजची स्त्री व संस्कृती यावर समाज प्रबोधन केले.योगिनी पिंगळे,मनीषा भट,रुपाली गुळवे,सीमा गायकवाड,भारती पाटील,डॉ.स्वाती देवरे,अभिनेत्री सायली पाटील,डॉ. प्रियंका बेंडाळे.जयश्री पवार,चारुलता नेमाडे,सदिच्छा पवार,श्रद्धा गौर या महिलांचा सत्कार करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्या नाहीत