Contact Banner

जळगावात ११ मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

Jaḷagāvāt-11-mārcha-rōjī- rōjagār-mēḷāvyāchē-āyōjan

जळगावात ११ मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

लेवाजगत न्यूज जळगाव- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे ११ मार्च, २०२३ रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे सकाळी १०.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे. 

     या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी एकूण २०५९ रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदासाठी शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी पास, आयटीआय., डिप्लोमाधारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.

  मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. विभागाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in

www.mahaswayam.gov.in

 यावर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच नांवनोंदणी न केलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावर त्वरीत नावनोंदणी करुन घ्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन नांव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येईल.

  तरी या मेळाव्याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा  असे आवाहन वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केलेले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९.४५ ते संध्या. ६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा.असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.