महिला दिनानिमित्त सावद्यात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार:पोलिस ठाणे येथे कार्यक्रम
महिला दिनानिमित्त सावद्यात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार:पोलिस ठाणे येथे कार्यक्रम लेवाजगत न्यूज सावदा:महीला या सक्षम आहेच.आणि त्यांनी ते आपल्या कार्य कर्तुत्वाने सिद्ध केले आहे.सावदा पोलिस ठाणे,आणि सकाळ ॲग्रोवन ने महिलांचा सत्कार केला हा एक सुत्य असा उपक्रम आहे.असे विचार डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्राचार्या भारती महाजन यांनी व्यक्त केले जागतिक महिला दिनानिमित्त येथील पोलीस ठाणे आवारात कार्यक्रम पार पडला यावेळी समाजातील प्रगतिशील शेतकरी यांचा सकाळ ॲग्रोवन तर्फे प्रगतिशील शेतकरी जयश्री अतुल नेहेते,मनीषा वारके,वैशाली रविंद्र पाटील,पूनम कमलेश भारंबे, प्रमिलाबाई प्रभाकर चौधरी,यांचा आणि गुणवंत विद्यार्थीनी दिव्या विनोद पाटील आणि उपस्थित सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य भारतीय महाजन प्रमुख अतिथी प्रा.व.पु होले सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे पोलीस उप निरीक्षक विनोद खांडवाले,मुनवर तडवी,माजी नगराध्यक्षा अनिता येवले,रेखा वानखेडे,नानासाहेब विष्णू हाती पाटील विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका शोभा ठोंबरे डायमंड स्कूलच्या प्राचार्य लक्ष्मी पुल्लीवर,श्रीधर सरोदे,रंजना भारंबे,करुणा पाटील,सुभद्रा बडगे, विजया जावळे,नंदा लोखंडे,सगिराबी सय्यद,शबाना तडवी आदी.मान्यवर उपस्थित होते. यावेळी विचार व्यक्त करताना प्रा.होले म्हणाले मुलांना सुसंस्कार देण्यासाठी महिलांची जबाबदारी खूप मोठी असते.ती त्यांनी पूर्ण केली तर सुसंस्कृत पिढी घडू शकते.सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे म्हणाले कायदा हा सर्वांसाठी समान आहे.महिलांनी अन्याय अत्याचार सहन करू नये.त्यांना न्याय देण्यासाठी कायदा सक्षम आहे.मुख्याध्यापिका ठोंबरे म्हणाल्या मुलांना घडविण्यासाठी आई म्हणून महिलेची मोठी जबाबदारी आहे.मुलांनी मोबाईल चा अतिरेक वापर टाळावा यासाठी महिलांनी लक्ष ठेवणे काळाची गरज आहे.सिमरन वानखेडे यांनी पण विचार व्यक्त केले.सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात मा जिजाऊ झाशीची राणी,सावित्रीबाई फुले,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु,यांच्या कार्य कर्तृत्वाचा उल्लेख करून गौरव केला. यावेळी महिलांनी केक कापून एकमेकांचे तोंड गोड केले.पोलीस स्टेशन तर्फे महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.कार्यक्रमाला आजी-माजी नगरसेविका महिला पोलीस पाटील,महिला शेतकरी,उपस्थित होत्या.घरातील गॅस महिलांनी सुरक्षितरित्या कसा वापरावा याबाबत सूर्या गॅस कंपनीतर्फे प्रात्यक्षिक सह माहिती देण्यात आली. सूत्रसंचलन मोहिनी पाटील आणि सकाळ बातमीदार प्रवीण पाटील यांनी केले.आभार महीला पोलिस हवलदार सारिका शाम कुवर आणि भाग्यश्री कोल्हे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत