सावदा आठवडे बाजारात झालेल्या तिहेरी अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
सावदा आठवडे बाजारात झालेल्या तिहेरी अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
लेवाजगत न्यूज सावदा ता रावेर -येथील खंडेराव वाडी जवळ आठवडे बाजारात दिनांक ४ रोजी सध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात ट्रॅक्टर वाहन व मोटारसायकल व सायकल असा तिहेरी अपघात झाला. या घटनेत १३ वर्षीय लहान मुलगा नूर मोहम्मद उपचाऱ्या दरम्यान मृत्यू झाला व मोटारसायकल स्वार तीन जखमी झाले. यातील गजानन भगवान सपकाळे ( कोळी ) वय २० वर्षीय युवकाचा फैजपूर येथील डॉक्टर शैलेश खाचणे यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये दिनांक ९ रोजी दुपारी ४ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे विरोदा येथील रहिवासी होते.या घटनेने ग्रामीण भागात हळ हळ व्यक्त केली जात आहे.
यात १३ वर्षीय बालक नूर मोहम्मद याचा प्रथम उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता .तसेच घटनेत मोटारसायकल तिब्बल शीट मोटार सायकलस्वार हे तिघे जखमी झाले होते. झाल्याने फैजपूर येथील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता दुचाकी वाहनांवर चालक गजानन भागवत सपकाळे वय २० वर्ष दोन मित्र यांचे सोबत जात असताना यातील गजानन भगवान सपकाळे याचा दि ९ रोजी दुपारी ४ वाजता उपचारा दरम्यान मृत्यूशीझूज देताना अखेर मृत्यू झाला आहे. असा या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अज्ञात ट्रॅक्टर चालक अद्याप ट्रॅक्टर वाहनां सह फरार होण्यात यशस्वी झाला आहेत. सर्व झालेल्या
नुकसानीस कारणीभूत झाल्याने यात दोन जणांचा मृत्यू व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो उप विनोद खंडबहाले करीत आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत