Contact Banner

सावदा येथे १० रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन, सायंकाळी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन, उपस्थितीचे ठाकरे गटाचे आवाहन


 सावदा येथे १० रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन, सायंकाळी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन, उपस्थितीचे ठाकरे गटाचे आवाहन

लेवाजगत न्यूज सावदा:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावदा शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय ट्रस्ट व गोदावरी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने, १० रोजी सकाळी १० ते दुपारी २ या काळात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. बस स्थानकासमोरील श्री लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. मोफत इसीजी, कार्डीओग्राफ, मधुमेह, रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. मुतखडा, मुत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट स्वादुपिंडातील गाठी, मुळव्याध हायड्रोसिल, अंडाशय शस्त्रक्रिया, भगंदर, पित्ताशयाचे खडे, पायातील शिरा फुटणे, मुत्रपिंडाचे आजार, पित्ताशयाचे खडे यावर उपचार व सल्ला दिला जाईल. तसेच गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जातील. गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख भरत नेहते, मिलिंद पाटील, शाम पाटील, धनंजय चौधरी, शरद भारंबे, गौरव भेरवा, नीलेश खाचणे, राजेंद्र माळी, वामन भारंबे, नितीन महाजन, संजय बेंडाळे, सुनील राणे, योगिता वायकोळे, गणेश देवकर, इरफान खान यांनी केले आहे. 

    संध्याकाळी मिरवणूक 

संध्यकाळी सहा वाजता सोमवारगिरी मढी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची रथावर सवाद्य मिरवणूक निघणार आहे. मिरवणूक सोमवारगिरी मढी चौक, स्वामीनारायण मंदिर, मोठा आड, पाटीलपुरा, इंदिरा गांधी चौक, छत्रपती संभाजी चौक, चांदणी चौक, जुनी कन्या शाळा, गांधी चौक, चावडी चौक, जामा मशीद, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे वंजारवाडी, दादा गल्ली, सुभाष मार्गे निघेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.