त्रिपुराचे भाजपा आमदार पॉर्न व्हिडीओ पाहताना सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल
त्रिपुराचे भाजपा आमदार पॉर्न व्हिडीओ पाहताना सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल
वृत्तसंस्था त्रिपुरा-त्रिपुराचे भाजप आमदार जादब लाल नाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात पॉर्न पाहत असताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ 30 मार्च म्हणजे आजचाच आहे. नाथ यांच्या मागे बसलेल्या एका आमदाराने हा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला.
या प्रकरणी त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य म्हणाले की, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी जादब लाल नाथ यांच्याशी चर्चा केली. पक्ष त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागेल. दुसरीकडे, नाथ यांनी एका सुनियोजित कट कारस्थानांतर्गत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणी पक्षापुढे बाजू मांडणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
जादब लाल नाथ त्रिपुराच्या बागबासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी दिली. पण सीपीएमच्या उमेदवार बिजीता नाथ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2023 च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा जादब लाल नाथ यांच्यावर विश्वास दाखवला. त्यात ते विजयी झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत