Contact Banner

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला तेव्हा गौरव यात्रा का काढली नाही ?अजित पवार यांचा सवाल

Chhatrapati-Shivaji-Maharaj-was-dishonored-why-did-not-gourav-yatra-?-Question-by-Ajit-Pawar-


 छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला तेव्हा गौरव यात्रा का काढली नाही ?अजित पवार यांचा सवाल 

वृत्तसंस्था नाशिक-स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याचा निषेध म्हणून भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गाैरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला, मात्र जेव्हा राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांचा अवमान झाला तेव्हा भाजपला अशा यात्रा काढण्याची बुद्धी का सुचली नाही? अशी टीका राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्यांना मतांपुरतीच महापुरुषांची आठवण येते, असा टाेला त्यांनी लगावला. जेव्हा सर्वाेच्च न्यायालयच सरकारला नपुंसक असल्याचा शिक्का मारते त्यापुढे बाेलायचे तरी काय, असे म्हणत त्यांनी भाजप व शिंदे शिवसेनेची खिल्ली उडवली.

     नाशिक दाैऱ्यावर असलेल्या पवार यांनी भाजप व शिंदे सेनेवर टीका केली. सोबत राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणूक कधीही लागू शकते. ते सर्वस्वी केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आतापासूनच काम करावे, त्यामुळे ‘अ’ पासून बाराखडीला सुरुवात करावी लागणार नाही, अशी सुचना त्यांनी यावेळी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.