Contact Banner

दोन महिने कॉलेज न जात मित्रांसोबत फिरायला गेली,कॉलेज मधून वडिलांना फोन तरुणाविरुद्ध गुन्हा

Two-months-out-of-college-went-out-with-friends,-call-father-from-college-crime-against-youth


 दोन महिने कॉलेज न जात मित्रांसोबत फिरायला गेली,कॉलेज मधून वडिलांना फोन तरुणाविरुद्ध गुन्हा 

वृत्तसंस्था अमरावती -सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीची‎ एका तरुणासोबत ओळख झाली. नंतर‎ त्यांच्यात मैत्री झाली. मला‎ तुझ्यासोबतच वेळ घालवायचा, असे‎ म्हणून मित्र कॉलेजला न जाऊ देता‎ बाहेर फिरायला घेऊन जायचा.‎ दरम्यान मुलगी दोन महिन्यांपासून‎ कॉलेजलाच आली नसल्याचे‎ शिक्षकांनी मुलीच्या वडिलांना फोन‎ करून सांगितले. त्यावेळी हा प्रकार‎ समोर आला. या प्रकरणी अल्पवयीन‎ मुलीने बडनेरा पोलिसांत तक्रार दिली.‎ मला जबरीने तो तरुण फिरायला घेऊन‎ जायचा, न गेल्यास धमकी द्यायचा,‎ त्यावरून पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध‎ गुन्हा दाखल केला.‎ 

     राज असे गुन्हा दाखल झालेल्या‎ तरुणाचे नाव आहे. राज आणि‎ पीडितेची सोशल मीडियावर ओळख‎ झाली. त्यामधूनच घनिष्ठ संबध झाले.‎ दरम्यान तू कॉलेजला जाऊ नको,‎ माझ्यासोबत फिरायला चल असे‎ म्हणून बाहेर चहा नाश्त्यासाठी घेऊन‎ जायचा. त्याने तिला मोबाइल घेऊन‎ दिला. तुझ्यासोबत लग्न करायचे असे‎ म्हटल्यावर मुलीने त्याला तू भेटायला‎ येऊ नकाे, तुझ्यासोबत कोणतेही संबंध‎ ठेवायचे नाही, असे सांगितले. त्यावर‎ राजने जीवाने मारुन टाकेल तसेच‎ माझ्या जीवाचे कमी जास्त करणार,‎ अशी धमकी दिली. 

     त्यामुळे आजवर‎ हे कोणालाही सांगितले नाही. असे‎ मुलीने तिच्या वडिलांना शिक्षकांसमोर‎ सांगितले. १८ मार्चला कॉलेजमधून‎ मुलीच्या वडिलांना फाेनवरून‎ शिक्षकाने सांगितले की, तुमची मुलगी‎ दोन महिन्यांपासून कॉलेजला आली‎ नाही. २५ मार्चला सायंकाळी पीडित‎ अल्पवयीन मुलीने आई-वडिलांसह‎ बडनेरा पाेलिस ठाणे गाठले. राजने‎ लग्नाचे आमिष देत पाठलाग करून‎ त्रास दिला, अशी तक्रार दिली.‎ तक्रारीवरून पोलिसांनी विनभंग,‎ धमकी देणे तसेच पोस्को कलमान्वये‎ राज नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल‎ केला.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.