माझ्या सोबत कॉफी प्यायला ये अन्यथा,आत्महत्या करतो ,महिला मैत्रिणींना अज्ञाताचा कॉल
माझ्या सोबत कॉफी प्यायला ये अन्यथा,आत्महत्या करतो ,महिला मैत्रिणींना अज्ञाताचा कॉल
छत्रपती संभाजीनगर न्यूज -एका महिलेला अज्ञात व्यक्तीने वारंवार कॉल करून ‘तुला भेटायचे आहे, तुझ्यासोबत फ्रेंडशिप करायची आहे. कॉफी प्यायला ये, अन्यथा आत्महत्या करताे,’ अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. ३२ वर्षीय तक्रारदार महिला एन-१ भागात कुटुंबासह राहते. १६ मार्च रोजी पहिल्यांदा त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल प्राप्त झाला. त्या वेळी त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर एका व्यक्तीने पुढील सहा दिवस ६ क्रमांकावरून कॉल करत ‘तुला भेटायचे आहे, फ्रेंडशिप करायची आहे,’ असे सांगून तो आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला.
एवढ्यावरच न थांबता त्याने त्यांच्या दोन मैत्रिणींचा संपर्क क्रमांक शोधून त्यांनाही सतत कॉल करून मानसिक त्रास दिला. महिलेने एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. क्रमांकावरून तांत्रिक तपास सुरू असून पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाल्याचे पातारे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत