समृद्धी मार्गावरून जाणाऱ्या वाहनावर दगडफेक दोन जण जखमी
समृद्धी मार्गावरून जाणाऱ्या वाहनावर दगडफेक दोन जण जखमी
प्रतिनिधी वैजापूर -हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सुराळा शिवारात काही लोकांनी एका वाहनांवर दगडफेक केली.
या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यातील मुलगा हा गंभीर झाला आहे. राजस्थान येथील भाविक हे शिर्डी येथून दर्शन घेऊन समृद्धी महामार्गावरून जीपने छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. त्या वेळी सुराळा शिवारात त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत