फेसबुकवर झाली ओळख, तरुणाने १२वीच्या विद्यार्थिनीला लॉजवर नेत केले धक्कादायक कृत्य
फेसबुकवर झाली ओळख, तरुणाने १२वीच्या विद्यार्थिनीला लॉजवर नेत केले धक्कादायक कृत्य
लेवाजगत न्युज नागपूर :फेसबुकवरून एकमेकांची ओळख झाल्यानंतर एका तरुणाने बारावीच्या विद्यार्थिनीला लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण लहारे (राहणार- नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय तरुणी केळवद पोलीस ठाण्यात अंतर्गत राहते. ती सावनेरच्या कॉलेजमध्ये शिकते. सप्टेंबर २०२२ मध्ये तिची फेसबुकवर प्रवीणशी मैत्री झाली. दोघांचे नाते वाढत गेले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रवीण तिला भेटण्यासाठी केळवडला जाऊ लागला. कधी कधी दोघे नागपुरात भेटत असत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
पुढे दोघांनी २६ फेब्रुवारीला भेटायचं ठरवलं. ठरवल्यानुसार प्रवीणने तिला नागपूरला बोलावले. सीताबर्डी परिसरात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर महाराज बागेत गप्पा मारायचे ठरले. काही वेळ बसल्यानंतर दुपारी दोन वाजता प्रवीणने तिला हॉटेलवर जेवायला जात असल्याचे सांगितले. दोघे थेट एका लॉजवर गेले. प्रवीणने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र तिने नकार दिला. त्यानंतर त्याने तिला संबंध संपवण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने शारीरिक संबंध ठेवण्यास होकार दिला.
नकार देऊनही प्रवीणने तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. प्रवीणने तिला कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर घरी मुलीच्या वागण्यावरून तरुणीचा आईला संशय आला. तिने तिला विश्वासात घेऊन विचारले आणि धीर दिला. त्यानंतर प्रवीणने आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. त्यामुळे तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत