Header Ads

Header ADS

अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईकस्वार केळी कामगार तरुणाचा मृत्यू


 

अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईकस्वार केळी कामगार तरुणाचा मृत्यू

लेवाजगत न्यूज सावदा -रावेर ते वाघोदा रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे रहिवाशी ३२ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनुस इतबार तडवी (वय ३२) रा. वाघोदा बुद्रुक ता. रावेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. 

     याबाबत अधिक माहिती अशी की, युनूस तडवी हा आई, पत्नी व दोन मुलांसह रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे वास्तव्याला होता. शेतात केळी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होतो. रविवारी २३ एप्रिल रोजी युनूस सायंकाळी ६ वाजता दुचाकी (एमएच १९ बीबी ०३९५) ने सासरी वडगाव येथे गेला होतो. तेथन परतत असतांना वाघोदा ते रावेर रस्त्यावर असलेल्या बाळू श्रावण महाजन यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने युनूसच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युनूस हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक हा वाहन घेवून पसार झाला.

 ही बाब युनूसचे काका हमीद हसन तडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असतांना पुतण्याचा मृतदेहपाहून हंबरडा फोडला. रावेर ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला. याप्रकरणी हमीद तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत युनूसच्या पश्चात आई जैनब तडवी, पत्नी काजल आणि दोन मुले असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.