Contact Banner

अजिंठा लेणीत मधमाश्याच्या हल्ल्यात २० पर्यटक व सहा कर्मचारी जखमी

 

20-tourists-and-six-employees-injured-in-bee-attack-at-Ajanta-cave

अजिंठा लेणीत मधमाश्याच्या हल्ल्यात २० पर्यटक व सहा कर्मचारी जखमी 

लेवाजगत न्यूज फर्दापूर -जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमध्ये‎ मधमाशांच्या हल्यात २० पर्यटक व‎ ६ कर्मचारी जखमी झाले असून‎ लेणी न पाहता अर्ध्यातून पर्यटकांना‎ माघारी फिरावे लागले. ही घटना‎ मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या‎ सुमारास घडली.‎ अजिंठा लेणीत असलेले‎ आग्यामोहोळाचे पाेळ भारतीय‎ पुरातत्त्व विभागाने काढलेले नाही.‎ सध्या लेणी क्र.४. ९. १०,१९ अाणि‎ २६ वर आग्यामोहोळ बसलेले आहे.‎ 


मंगळवारी दुपारी लेणी क्र. १० च्या मुख्य‎ प्रवेशद्वारावर बसलेले मधमाशा‎ उठल्या अाणि त्यांनी पर्यटकांवर‎ हल्ला चढवला. आंध्र प्रदेशातून‎ आलेल्या एका पर्यटक कुटुंबावर‎ हल्ला केला असून त्यांच्यातील एक‎ पर्यटक जास्त जखमी झाला तर‎ बाकी किरकाेळ जखमी झाले.‎ तसेच ६ कर्मचारी असे २६ जण‎ जखमी झाले. 

   या मधमाशांच्या‎ हल्ल्यामुळे काही पर्यटक लेणी न‎ पाहता लेणी क्रमांक ६ पासून माघारी‎ परतले. भारतीय पुरातत्त्व विभागाचे‎ कर्मचारी भारत काकडे, रामधन‎ सोन्ने, गणेश मोहिते, रमेश फुकटे,‎ फकिरा तडवी, उखर्डू रावलकर हे‎ मधमाशांच्या हल्ल्यात जखमी‎ झाले. स्थानिकांनी जखमी‎ पर्यटकांच्या अंगात मधमाशांचे‎ रुतलेले काटे काढले.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.