Contact Banner

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पगार व अनुदानाची रक्कम शासनाकडून रडखडली,२८ एप्रिल ला निदर्शने करण्याचा इशारा

City Council-Employees'-salary-and-grant-amount-screamed-by-the-Government, 28-April- hint-to-protest-

 

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पगार व अनुदानाची रक्कम शासनाकडून रडखडली,२८ एप्रिल ला निदर्शने करण्याचा इशारा 

लेवाजगत न्यूज नाशिक-राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांची सहायक वेतन अनुदानाची रक्कम रखडलेली आहे. शासनाने २७ एप्रिलपर्यंत थकीत वेतनाची रक्कम अदा न केल्यास २८ एप्रिलला सकाळी ११ वाजता सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींसमाेर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद व नगरपंचायत संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

    महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे यासाठी शासनाकडून सहायक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत नगरपरिषदांना मिळावी म्हणून यापूर्वीच संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. २० मार्च रोजी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबत झालेल्या बैठकीत सहायक वेतन अनुदानाचा प्रश्न मांडण्यात आला होता.

यावेळी शिक्षकांसाठी राबविण्यात येणारी शालांत सेवार्थ प्रणाली राबवून सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्याच्या दृष्टीने सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. त्यामुळे राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. २७ एप्रिलपर्यंत वेतन न मिळाल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक डॉ. डी.एल. कराड, रामगोपाल मिश्रा, डी. पी. शिंदे, सुनील वाळुंजकर, संतोष पवार यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.