ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जखमी
मयत दिनकर रामकृष्ण कोळी
ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जखमी
लेवाजगत न्यूज ऐनपूर- येथील वर्षानुवर्षे चालत आलेली बारागाड्या ओढण्याची परंपरा कोरोना काळ वगळता यंदाही कायम ठेऊन ऐनपूर येथील बारीघाट येथे बारागाड्या ओढण्यात आल्या परंतु यात बारगाड्याचा ताबा सुटल्याने एक जणाचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ही जुनी असून वर्षानुवर्षं येथे बारागाड्या ओढण्यात येत असतात,परंतु संपूर्ण देशात कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने कोरोना काळ वगळता ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली होती.अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी या बारागाड्या ओढण्यात येतात.
रविवारी ऐनपुर येथील बारिघाट येथे या बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु त्या ओढत असताना गाड्यांचा ताबा सुटल्याने प्रेक्षकांमधून दिनकर रामकृष्ण कोळी,सह भगतीन मंगलाबाई प्रकाश भिल,सुभाष भील,ईश्वर भील,नामदेव भील,किशोर हरी पाटील ,मोहन एकनाथ महाजन, तर बगल्यांमधे सुनील राजाराम महाजन तसेच ज्यु ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रूपा भिल्ल, हे जखमी झाले.पोलीस प्रशासन व गावकरी मंडळी यांनी जखमींना तात्काळ तेथून हलवून रुग्णालयात दाखल केले यात दिनकर रामकृष्ण कोळी वय ६० वर्ष यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता त्यांना मयत घोषित केले. तर बाकी जखमीवर उपचार सुरू आहे.
बारागाड्या भगत सोपान भील तर बगले म सुनील महाजन आणि सचिन महाजन हे सहायक होते.निंभोरा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, नितीन पाटील ,योगेश चौधरी व गुरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्थ ठेवला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत