भालोद येथे मरिमातेच्या दहावर्षाचा बालक रणवीर कोळी याने तर खंडोबाच्या सचिन कोळी यांनी ओढल्या बारागाड्या
भालोद येथे मरिमातेच्या दहावर्षाचा बालक रणवीर कोळी याने तर खंडोबाच्या सचिन कोळी यांनी ओढल्या बारागाड्या
लेवाजगत न्यूज भालोद -तालुका यावल येथील श्री मरीमाता यात्रा व श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडला गेल्या ४० वर्षाच्या काळात एक नवीन इतिहास म्हणजे केवळ दहा वर्षे वय असलेल्या व इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या भगत रणवीर राजू कोळी या बालकाने श्री मरी माता मंदिरा जवळील बारा गाड्या शनिवारी ओढल्या.
हा व्हिडीओ बघा-रणवीर कोळी या दहावर्षाच्या मुलाने मरीमातेच्या व खंडोबाच्या सचिन कोळी यांनी ओढल्या भालोदलाबारागाड्या
कोळी कुटुंबीयांना सुतुक असल्याने कोळी पंचमंडळीने हा निर्णय घेतला संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एवढ्या बाल वयातील बालकाने बारा गाड्या ओढल्याने परिसरातील नागरिकांनी व गावातील नागरिकांनी या ठिकाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच खंडेराव महाराज मंदिराजवळील बारा गाड्या रविवारी सचिन निळकंठ कोळी या युवकाने ओढल्या या प्रसंगी सरपंच प्रदीप श्रीराम कोळी, मधुकर दोधू कोळी, रामा भागवत कोळी ,सुधाकर सदू कोळी, रामकृष्ण सदू कोळी ,पंढरी भागवत कोळी, माधव राजाराम कोळी, निलेश पंढरी कोळी, पितांबर कुंभार, शंकर बूधो भोई, मोहन झांबरे, योगेश नेमाडे ,ललित झांबरे, हूना चोपडे, पिंटू चौधरी, धनराज झोपे,जितेंद्र रघुनाथ कोळी सुनील मधुकर कोळी दीपक श्रीराम कोळी चेतन माधव कोळी अदि सह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थित होते याप्रसंगी फैजपुर पोलीस स्टेशनचे सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत