अंधश्रद्धेपोटी सुलेमानी दगडाच्या नावाने व्यावसायिकास लुबाळले
अंधश्रद्धेपोटी सुलेमानी दगडाच्या नावाने व्यावसायिकास लुबाळले
लेवाजगत न्यूज जळगाव -अंधश्रद्धेपोटी दैवी शक्ती असलेला सुलेमानी पत्थर विकत देण्याच्या बहाण्याने आंध्र प्रदेशातील भंगार व्यावसायिकाला लुटल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात ७जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शेख युनूस शेख कादर बादशहा (वय ४८,व्यवसाय भंगार व्यापार. रा. श्रीनिवासन,पुरुम तिरुपती, जि.चित्तुर राज्य आंध्रप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, अक्काबाई जोगींदर भोसले, शिवदत्त जोगींदर भोसले, दयाल जोगींदर भोसले, जोगींदर राजवंती भोसले, शिवकिसन जोगींदर भोसले, रितु मंदुस पवार, कृष्णा भोसले (पुर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. लालगोटा ता. मुक्ताईनगर) या सर्व संशयित आरोपीतांनी सुलेमानी पत्थर विकत देण्याचे बहाण्याने लालगोटा ता. मुक्ताईनगर गावी बोलावुन त्यांची दिशाभुल केली.
तसेच त्यांना घरात नेऊन सुलेमानी पत्थर न देता फसवणुक केली. त्यानंतर चापाटा बुक्यांनी मारहाण केली व त्यांच्या जवळील खिशातील ६२ हजार रुपये रोख व एक लाख रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या बळजबरीने काढुन घेतल्या. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप दुनगहु हे करीत आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यात नागमणी व पैशांचा पाऊस पाडण्याचे बहाणे करुन यापूर्वी अनेकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. नागमणी प्रकरणात अनेक गुन्हे दाखल आहेत. यानंतर आता भामट्यांनी नवीन शक्कल लढवून सुलेमानी पत्थर विक्रीचा घाट घातला आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा हा प्रकार आहे. अनेक लोक याला बळी पडत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत