लाचखोर कोतवालासह पंटर एसीबीच्या जाळ्यात मंडळाधिकाऱ्याच्या नावाने मागितली १२ हजाराची लाच; पथकाने रंगेहात पकडले
लाचखोर कोतवालासह पंटर एसीबीच्या जाळ्यात मंडळाधिकाऱ्याच्या नावाने मागितली १२ हजाराची लाच; पथकाने रंगेहात पकडले
लेवाजगत न्यूज भुसावळ:- शेतीची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदाराकडून १२ हजाराची लाच घेतांना कोतवालासह एका खासगी पंटरला रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी सन २०२२ मध्ये जळगांव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामधील कुऱ्हे पानाचे या गावात स्वतःच्या नावे २ एकर शेतजमीन विकत घेतली आहे .सदर शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रादार यांचे स्वतःचे नावं लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे येथे नांव लावणेसाठीचे प्रकरण टाकले होते सदर प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्यात त्रुटी काढून तक्रारदार यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते.
तक्रारदार कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटले असता कोतवाल यांनी तक्रारदार यांना मी तुमचे काम मंडळ अधिकारी योगिता पाटील यांच्या कडून करून आणतो असे सांगून तक्ररदार यांना ७/१२ च्या उताऱ्यावर नावं लावण्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी यांचे नाव सांगून १५ हजार रुपयांची लाच मागणी केली त्या बाबत तक्रारदार यांनी दिनांक १८/०४/२०२३ रोजी तक्रार दिल्यावरून आज रोजी पंचासमक्ष पडताळणी कारवाई केली.यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्या कडे प्रथम १५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १२ हजार रुपये लाच रकमेची मागणी करून पंटर कडे कडे देण्यास सांगितले यातील खाजगी इसम यांनी तक्रारदार यांचे कडून १२००० रुपये कोतवाल यांच्या साठी स्वतः पंचा समक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. वर नमूद दोन्ही इसमा विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत