सिक्कीम मध्ये हिमस्खलन ६ जणांचा मृत्यू१५० पर्यटक दबले गेल्याची भीती
सिक्कीम मध्ये हिमस्खलन ६ जणांचा मृत्यू१५० पर्यटक दबले गेल्याची भीती
वृत्तसंस्था सिक्कीम-सिक्कीमचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या गंगटोकमध्ये मंगळवारी हिमस्खलन झाले. त्यात ६पर्यटकांचा बळी गेला, तर १५० जण बर्फात अडकल्याची माहिती आहे. मृतांत १ महिला व एका मुलासह इतर ४पुरुषांचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी १२.२०च्या सुमारास गंगटोकला नाथुला पासशी जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे जाण्यासाठी एक विशेष पास जारी केला जातो. हा पास १३ मैलांसाठी जारी केला जातो. पण पर्यटक विनापरवानगी १५ व्या मैलाच्या दिशेने गेले. ही घटना १५ व्या मैलावरच घडली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत