Contact Banner

जय श्रीराम लिहलेल्या पिकअप गाडीतून कत्तलीसाठी नेणाऱ्या गायी पकडल्या

जय श्रीराम लिहलेल्या पिकअप गाडीतून कत्तलीसाठी नेणाऱ्या गायी पकडल्या


 जय श्रीराम लिहलेल्या पिकअप गाडीतून कत्तलीसाठी नेणाऱ्या गायी पकडल्या 

वृत्तसंस्था चोपडा-"जय श्रीराम" लिहलेल्या पिकअप गाडीमधून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांवर चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील आशा टॉकीज भागातून गुरांना कत्तलीसाठी नेत असताना शहरातील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने शनिवारी (ता. २) रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास ही गाडी पकडली. त्यानंतर गाडीचालक व क्लिनरवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Lewajagat.com


   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातेड फाट्यावर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व चोपडा ग्रामिण पोलीस ठाण्याचे पोलीस हे बंदोबस्त करीत असताना चोपड्याकडे भरधाव वेगात जाणारी पिकअप गाडी आली. ही गाडी थांबवण्याची सूचना पोलिसांनी केली. तरीही गाडी थांबली नाही. म्हणून तिचा पाठलाग करून ती गाडी चोपडा शहरातील आशा टॉकीज भागात शहरातील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पकडली. या गाडीत अवैधरित्या नऊ गोरे कोंबून भरलेले आढळून आले. यावेळी गाडीचे चालक व क्लीनर यांना पोलिसांनी विचारले असता हे गोरे आम्ही कत्तलीसाठी सवुद सलीम कुरेशी (रा. चोपडा ) यांना देणार असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

लेवा अभिमान पुरस्कार 2023


    यानंतर चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे यांच्या फिर्यावरून गाडी चालक अनुराग गंगाराम चव्हाण (वय २०) वय व सुशील संपत पवार (वय २१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास एएसआय किशोर शिंदे करीत आहे.

     विशेष म्हणजे आरोपींनी पीकअप गाडीवर 'जय श्रीराम' असे मोठ्या अक्षरात लिहिले होते. 'जय श्रीराम' लिहिल्यावर आपली गाडी कोणी अडविणार नाही, असा आरोपींचा समज होता. गाडीत ९ गुरांना अमानुषपणे कोंबले होते. पोलिसांनी एकूण ९०हजारांची गोरे व २ लाख किंमतीची गाडी असा एकूण २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोऱ्हे चोपडा शहरातील रामगोपाल गो शाळेत सोडण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.