Header Ads

Header ADS

दहिगाव मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती फलकाची विटंबना


 दहिगाव मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती फलकाची विटंबना

लेवाजगत न्युज भुसावळ:- तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची शनिवारी रात्री दहा वाजेवाजेचे सुमारास अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले. या प्रसंगी सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर गंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांचे सह पोलीसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. , दरम्यान महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा फलक विटंबना प्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली. दहिगाव गावात विटंबनानंतर तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल दहिगाव सावखेडा बस सेवा सकाळ पासून बंद करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.