Header Ads

Header ADS

जळगाव शहरातील तरुण तेजस भंगाळे वाईल्ड फोटोग्राफी मध्ये भारतात पहिला

जळगाव शहरातील तरुण तेजस भंगाळे वाईल्ड फोटोग्राफी मध्ये भारतात पहिला

 

जळगाव शहरातील तरुण तेजस भंगाळे वाईल्ड फोटोग्राफी मध्ये भारतात पहिला


शाम पाटील सावदा-जळगाव मधील एका तरुण छायाचित्रकारानं सध्या जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावलं आहे. तेजस भंगाळे असं या वाईल्ड फोटोग्राफी अँड मॉडलिंग फोटोग्राफी छायाचित्रकाराचं नाव असून त्याला इटली आणि रशियामधील नामांकित स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळाली आहेत.





     ही पारितोषिकं मिळवणारा तेजस हा पहिला भारतीय ठरला आहे. जळगावला राहणाऱ्या तेजस भंगाळे याला लहानपणापासूनच वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अँड मॉडलिंग फोटोग्राफी आवड होती. हैदराबाद आर्ट्समधून तेजसने फोटोग्राफीचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर तोही स्वतंत्रपणे वाईल्डलाईफ फोटोग्राफी अँड मॉडलिंग फोटोग्राफी करु लागला.देशाबाहेर किंवा फारसं लांब न जाता त्याने जळगाव जिल्ह्याला लाभलेल्या निसर्गाची निवड केली. जळगाव जिल्हात तसंच कांताई बंधारा,मेहरूण तलाव ,मनुदेवी , पद्मालय , पाटणादेवी , या परिसरात फिरून त्याने अनेक चांगली छायाचित्रं आपल्या कॅमेरात टिपली.काही महिन्यांपूर्वी तेजसने जळगावच्या मेहरूण तलाव जवळ सीगल पक्षांच्या थव्याचं एक अतिशय सुंदर छायाचित्र टिपलं होतं. हे छायाचित्र त्यानं इटलीच्या अ‍ॅस्पेरिका आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पाठवलं. या स्पर्धेत तेजसला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि ६०० युरो असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.त्यानंतर तेजसने पाटणादेवीच्या जंगलात भक्ष्याच्या प्रतिक्षेत असलेला सापाचा काढलेला फोटो रशियातील गोल्डन टर्टल फेस्टिव्हल या फोटोग्राफीच्या स्पर्धेत पाठवला होता. या छायाचित्राला त्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे.



तेजस भंगाळे यांचे  जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे तसेच विशाल भोळे, महेश चौधरी , नगरसेवक आशुतोष पाटील, नगरसेवक उमेश सोनवणे , नगरसेवक विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन , सुनील महाजन यांनी अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.