गुरुवारी सावदा येथे मरीआईच्या यात्रोत्सव निमित्त गणेश चौधरी ओढणार बारागाड्या
गुरुवारी सावदा येथे मरीआईच्या यात्रोत्सव निमित्त गणेश चौधरी ओढणार बारागाड्या
लेवाजगत न्यूज सावदा- येथे सालाबादाप्रमाणे मस्कावद रोडवर असलेल्या शनेश्वर नगर परिसरातील ग्रामदेवता मरी माता चा मोठा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेला गुरुवार या दिवशी होणार आहे. या यात्रेनिमित्त संध्याकाळी गणेश गोपाळ चौधरी हे भगत बारागाड्या मरीमाता की जय च्या जयघोषात ओढणार आहे.
सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे गेल्या आठ दिवसापासून शहरातील ग्रामदेवता श्री मरीआई च्या यात्रेनिमित्त तेलीवाडा परिसरात राहणारे भगत गणेश चौधरी यांचे सोबती गावातील प्रत्येक घरातून वारी मागत असून या वारीतून येणाऱ्या रकमेतून बारा गाड्यांसाठी लागणारी पूजाअर्चा पूर्ण करीत असतात.वारी मागण्याचा असा हा कार्यक्रम गेल्या आठ दिवसापासून सुरू असून त्या रकमेतून हा उत्सव साजरा होत असतो. गेल्या तीनशे वर्षाची परंपरा असलेले ही ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्त आतापर्यंत कै. सेनू पांडू चौधरी, कै. गणपत दगडू चौधरी, कै.गोपाळ गणपत चौधरी यांच्यानंतर या वर्षी भगत गणेश गोपाळ चौधरी ही पाचवी पिढी मरीमाता यात्रोत्सवानिमित्त बारा गाड्या ओढणार आहे. पुरोहित संतोष जोशी हे देवीचे पूजन व आरती करतील.
त्यांच्या साथीला पांडुरंग चौधरी, संजय चौधरी, भागवत चौधरी, प्रशांत चौधरी, प्रभाकर चौधरी, रमेश चौधरी ,प्रमोद चौधरी, छोटू चौधरी, सुनील चौधरी, मदन सुपडू चौधरी, सुभाष चौधरी, नंदू तांबटकर, राजू तांबटकर, गजानन काळू चौधरी, प्रमोद तेली हे या बारागाड्यां व पूजा अर्चा आरती करण्यासाठी सहकार्य करतात -.गुरुवारी ओढल्या जाणाऱ्या मरीआई च्या यात्रोत्सव व बारागाड्या चा दर्शनाचा लाभ घ्यावा असे मरीआई व शनेश्वर महाराज ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत