Contact Banner

वादळी पावसाने बुरहानपूरमध्ये केळीचे अतोनात नुकसान

वादळी पावसाने बुरहानपूरमध्ये केळीचे अतोनात नुकसान


वादळी पावसाने बुरहानपूरमध्ये केळीचे अतोनात नुकसान

लेवाजगत न्यूज:- गारपीटसह महामार्गासह अनेक मार्गांवर झाडे, विजेचे खांबही उन्मळून पडली अनेक रस्ते ही बंद.

     गेल्या पंधरवड्याहून अधिक काळ अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना रळकुंडीला आणले  आहे.  शुक्रवारी दुपारी पुन्हा बऱ्हाणपूर जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. शुक्रवार  (२७) दुपारी तीन वाजल्यापासून सुमारे तासभर पाऊस झाला.  त्यासोबत बोरांच्या  आकाराच्या गाराही पडल्या. त्यामुळे केळी व हळद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  केळीची झाडे उपटून शेतात पसरली आहेत.  येथे इंदूर-इच्छापूर आणि अमरावती महामार्गावर अनेक मोठी झाडे उन्मळून पडली.  अनेक भागात लोकांच्या घरावरील  पत्रे उडून गेले आहेत.  अनेक ठिकाणी विद्युत खांब, डीपी उखडले आहेत.

पावसामुळे हळद भिजल्याने कुजण्याचा धोका वाढला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  याशिवाय खकनार, शहापूर भागातील मका पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  एका अंदाजानुसार जिल्ह्यातील सुमारे सातशे एकर पिकांचे नुकसान झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळ आणि पावसाने शाहपूर, खकनार, धुलकोट, नेपानगर परिसरातील ४० हून अधिक गावांमध्ये कहर केला आहे.  खाकनार परिसरातील डोईफोडिया, तुकाईथड , धाबा, खाकनारसह डझनहून अधिक गावांतील केळी, हळद, मका पिकांचे नुकसान झाले आहे.

      शहापूर परिसरातील बंभाडा, भावसा, मोहद ,खामणी, धामणगाव, दापोरा, चापोरा, आडगावसह अन्य गावांमध्ये केळी व हळदीचे नुकसान झाले आहे.  तसेच नेपानगर परिसरातील डझनहून अधिक गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे.  वादळ आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या व माजी मंत्री अर्चना चिटणीस यांनी बांभाडा व इतर गावात पोहचल्या .  त्यांनी शेतांना भेटी देऊन पिकांचे झालेले नुकसान पाहिले व ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.  त्यांनी जिल्हाधिकारी भव्य मित्तल यांच्याशी चर्चा केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.