Header Ads

Header ADS

“फडणवीस घोटाळेबाजांची टोळी चालवतात का?”, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “मी मुंबईला गेल्यावर…”

 

"Hou Fadnavis-'n-bende-swendelaars?", Sanjay-Rauta se-kritiek-op-die-korrupsie-bewerings-op-die-ministers;-sê,-"Nadat-ek-na-Mumbai "

“फडणवीस घोटाळेबाजांची टोळी चालवतात का?”, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “मी मुंबईला गेल्यावर…”

जळगाव-गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळातील सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर ४०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्र सोडलं. जळगावात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

   नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

   देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. मात्र, त्यांची नेमकी कोणती अडचण झाली आहे? आज राज्याच्या मंत्रीमंडळातील भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मोकळ आहेत. ते फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचारी, घोटाळेबाज आणि गुंडांची टोळी चालवत आहेत का? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

    मी मुंबईला गेल्यावर गुलाबराव पाटलांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. यापूर्वी दादा भूसे, राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे त्यांना पाठवली होती. त्यांना यासंदर्भात १० वेळा पत्रही लिहिली. मग फडणवीस नेमके काय करत आहेत? कोणाला टोप्या लावत आहेत? असेही ते म्हणाले.

    पुढे बोलताना त्यांनी मंत्र्यांवरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीसांना आव्हानही दिलं. शिंदे सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे फडणवीसांना दिले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी याप्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपींवर कारवाई करून दाखवावी, असे ते म्हणाले.

    दरम्यान, तत्पूर्वी संजय राऊतांनी आज मंत्री गुलाबराव पाटलांवर करोना काळात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला. करोना काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होती. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचं व्हेंटीलेटर १५ लाखांना खरेदी केले गेले. महत्त्वाचे म्हणजे या भ्रष्टाचारावर त्याच गॅंगचे सदस्य चिमनराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. हा घोटाळा साधारण ४०० कोटी रुपयांचा आहे. मात्र, हे प्रकरण दाबलं जात आहे, असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.