Contact Banner

मातीत अवैध वाहतूक जेसीबी सह ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने पकडले

 

मातीत अवैध वाहतूक  जेसीबी सह ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने पकडले

मातीत अवैध वाहतूक  जेसीबी सह ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने पकडले

लेवाजगत न्यूज सावदा- येथून जवळच असलेल्या  तासखेडा उदळी रस्त्यावर येथे महसूल च्या पथकाने शनिवार रात्री दहा वाजेला उदळी शिवारात अवैद्य रित्या बिना परवाना  मातीची वाहतूक करताना जेसीबी व ट्रॅक्टर पकडले.

   शनिवार  रोज १ रोजी रात्री १०.०० वाजता अवैधरीत्या माती वाहतूक करतांनाबिना नंबर चे  जेसीबी  व ट्रॅक्टर  एम एच १९ सि व्ही १३९६  या वाहनाव्दारे तासखेडा  ते उदळी येथील रस्त्यावर आढळून आले त्यास  तलाठी व पथकाने पकडले. माती भरुण विनापरवाना उत्खनन करून  जेसीबी चालक प्रकाश अरुण कोळी वय २४  राहणार पुरी व ट्रैक्टर चालक महेंद्र भागवत कोळी वय ३७ रा तांदलवाडी यांना तलाठी सावदा व पथक यांनी माती वाहतुकीचा परवाना आहे अगर उसे याबाबत विचारणा केली असता त्यांचेकडे कोणत्याच प्रकारचा माती वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. ही उत्खनन व माती वाहतूक हे वटील दोन्ही वाहनाचे मालक किशोर नारायण चौधरी  राहणार तांदलवाडी यांचे मालकीचे असुन त्याचेच सागणेवरून  विनापरवाना उत्खनन  करुण वाहतुक करत असल्याचे सांगीतले.   

    सदर जेसीबी व ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने जप्त केले व रात्री सावदा पोलिसांच्या ताब्यात दिनही वाहने दिली सकाळी येथून ही वाहने रावेर तहसील कार्यालयात हलवण्यात आली.

   महसूल विभागातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहिच्या पथखात शरद पाटील तलाठी सावदा,ओमप्रकाश मटाले तलाठी मस्कावद,मुबिन मोमीन तलाठी उदळी बुद्रुक,पंढरी कोळी कोतवाल रायपुर,समीर तडवी तलाठी निंभोरा बु,दीपक गवई मंडळ अधिकारी निंभोरा बु यांनी ही कार्यवाही केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.