सावद्यात बंद घरातून पैसे, दागिने लंपास
सावद्यात बंद घरातून पैसे, दागिने लंपास
लेवाजगत न्यूज सावदा-येथील डॉ. कुलकर्णी यांच्या हॉस्पिटल मागील सोमेश्वर नगरातील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त कर्मचारी देविदास तायडे यांच्या बंद घरात चोरी झाली. चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने मिळून १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
देविदास तायडे यांनी नुकतेच नवीन घराचे बांधकाम केले आहे. तेथे त्यांनी संसारोपयोगी साहित्य शिफ्ट केले. पण, ते रहायला गेलेले नव्हते. त्यामुळे अधूनमधून नवीन घरी फेरी मारायचे. दरम्यान, त्यांचे घर सोमेश्वर नगरात शेवटी असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी २९ मार्च रोजी घरातील कपाट फोडून दोन तोळे सोने (६० हजार) आणि रोख ५० हजार रुपये असा १ लाख दहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ३० मार्चला सकाळी ९ वाजता तायडेंचा मुलगा आकाश घराच्या साफसफाईसाठी गेल्यावर हा प्रकार उघड झाला. याबाबत सावदा पोलिसांना माहिती देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत