सॅनेटरी पॅड च्या आडून विदेशी दारूची अवैध वाहतूक
सॅनेटरी पॅड च्या आडून विदेशी दारूची अवैध वाहतूक
वृत्तसंस्था धुळे-गोव्यातून विदेशी दारु घेऊन ती सुरतच्या दिशेने धुळेमार्गे अवैधपणे नेली जात होती. विशेष म्हणजे पकडले जाऊ नये यासाठी गुन्हेगारांनी एक नामी शक्कल लढवली होती. सॅनिटरी पॅडच्या आडून विदेशी दारु नेण्याचा हा स्कॅम केला जात होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले आहे.
दोन आरोपींच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुद्देमाला सकट मूसक्या आवळल्या आहेत. गोव्यातून दारु विकत घेऊन ती धुळे मार्गे सुरतला नेली जात होती. ट्रकमधून ही अवैध वाहतूक केली जात होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरिक्षक हेमंत पाटील यांना आपल्या खबऱ्यामार्फत या प्रकाराबाबत माहिती कळाली.
ही गुप्त बातमी हाती येताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर हा ट्रक पोलिसांनी पकडला. चौकशी केल्यावर संबंधित प्रकार लगेचच उघड झाला. पोलिसांनी ट्रकचालकाला विचारणा केली असता यात सॅनिटरी पॅड असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात सॅनिटरी पॅडच्या आडून विदेशी दारु आढळून आली.
या ट्रकमध्ये १०लाखाहून अधिकची दारु आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दारुसहित एकुण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाला पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी ५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहिर केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत